'फोडाफोडीपेक्षा समाजहिताचे राजकारण करा'
नाना पटोले यांचा देवेंद्र फडणवीस यांना सल्ला
मुंबई: प्रतिनिधी
धाक अथवा आमिष दाखवून फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सत्ता राबवा, असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नाही. त्यांचा पहिला भोंगा सकाळी नऊ वाजता असतो. दुपारी बाराचा दुसरा भोंगा पहिल्याचा मुद्दा खोडून काढतो तर संध्याकाळचा भोंगा दोघांनाही खोटं पाडतो. महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला भेगा गेल्या आहेत, अशा शब्दात फडणवीस यांनी आघाडीची खिल्ली उडविली होती. त्यावर पटोले यांनी पलटवार केला आहे.
शिंदे फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा सातत्याने केला जातो. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. हरभरा, मूग, तूर ही घरात पडून आहेत. नैसर्गिक आपत्तीने संकटात आलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. महागाई आणि बेरोजगारी यामुळे सर्वसामान्य जनता त्रासलेली आहे. त्यामुळे सरकारने या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करावे, असे नाना म्हणाले.
Comment List