'काँग्रेस एकीकडे न्यायपत्र प्रसिद्ध करते आणि...'

देवेंद्र फडणवीस यांची नाना पटोले यांच्यावर टीका

'काँग्रेस एकीकडे न्यायपत्र प्रसिद्ध करते आणि...'

मुंबई: प्रतिनिधी

काँग्रेस पक्ष एकीकडे ‘न्यायपत्र’ प्रसिद्ध करतो आणि दुसरीकडे त्यांचे प्रदेशाध्यक्ष एका खासदाराच्या मृत्यूची कामना जाहीरपणे व्यक्त करतात, हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. त्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

निवडणुकीत आपण एकमेकांचे विरोधक असलो तरीही विरोधकांच्या मृत्यूची कामना करणे हे संवेदनशीलतेचे लक्षण नाही. ती महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. या वक्तव्याबद्दल पटोले यांनी अकोलेकरांची माफी मागावी, अशी मागणी करतानाच फडणवीस यांनी संबंधित खासदार संजय धोत्रे यांना दीर्घायुष लाभावे, अशी प्रार्थना ही फडणवीस यांनी केली.

 समाज माध्यमांवर पोस्ट करून फडणवीस यांनी पटोले यांच्यावर टीका करतानाच त्यांच्याकडे माफी मागण्याची मागणी केली आहे.

हे पण वाचा  'आम्हाला एक खून माफ करा'

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us