धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची निर्घृण हत्या, तळेगाव दाभाडे येथील धक्कादायक घटना
भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.हत्येच्या घटना वारंवार समोर येत आहेत.अशीच एक घटना मावळ तालुक्यातील तळेगावमध्ये घडली आहे.वयक्तिक जुन्या वादातून चौघांनी एकावर धारदार कोयत्यानी डोक्यात दोन व हातावर तीन वार करून खून केल्याची घटना तळेगाव शहरात शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी 4:30 वा. सरस्वती विद्या मंदिराच्या गेटजवळ घडली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये मयताच्या आईने फिर्याद दिली आहे. खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
आर्यन शंकर बेडेकर (वय 19, रा. सिद्धार्थ नगर तळेगाव दाभाडे ता. मावळ) खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
संतोष कोळी, शिवराज कोळी दोघे रा वराळे ता. मावळ व इतर दोघेजण खुनातील आरोपी आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनावर यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत आर्यन बेडेकर व आरोपी हे मित्र होते. त्यांच्या जुन्या वादातून आरोप संतोष कोळी, शिवराज कोळी व इतर दोघांनी धारदार कोयत्याने डोक्यात व डाव्या हातावर वार केले. यात गंभीर जखमी होवून रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. घटनास्थळावरून आरोपी फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली, मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.
पोलीस पथके रवाना केली असून सीसीटिव्ही कॅमेरे तपासणी केली असून आरोपींना लवकरच अटक करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए.के मुल्ला करत आहेत.
Comment List