'लाडकी बहीण योजना हा निवडणुकीसाठीच्या बनाव'
राजु शेट्टी यांचा महायुतीवर आरोप.
मुंबई: प्रतिनिधी
तत्कालीन महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणि आनंदाचा शिधा अशा योजना आणून शासकीय तिजोरीतून मतदारांना लाच दिली. आहे. या योजना हा निवडणुकीचा बनाव आहे. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.
निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणी योजना अमलात आणण्यात आली. या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे रवाना झाले. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे मानले जाते.
मात्र, निवडणूक पार पडल्यानंतर सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या पात्रतेची छाननी करण्याची मोहीम घेतली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्रतेची छाननी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार तब्बल पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
सरकारच्या या कृतीवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. कल्याणकारी योजनांच्या नावाखाली तत्कालीन सरकारने लाडकी बहीण व आनंदाच्या शिधा, अशा योजना जाहीर करून मतदारांना भुरळ घातली आणि सत्ता हस्तगत केल्यानंतर पात्रतेच्या नावाखाली लाभार्थींना मर्यादा घातल्या आहेत. ही मतदारांची फसवणूक आहे, असा आरोप केला जात आहे.
Comment List