पुणेकर विद्यार्थिनी शिवका खरे हिची आयआयएमए अहमदाबाद येथे प्रशिक्षणासाठी निवड
आपल्या ज्ञानाद्वारे देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याचा निर्धार
पुणे: प्रतिनिधी
व्यवस्थापन क्षेत्रात प्रशिक्षण देणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद या संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून पुणेकर विद्यार्थिनी शिवका खरे हिची निवड झाली आहे. आपल्या ज्ञान आणि प्रशिक्षणाचा वापर करून देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याचा निर्धार तिने व्यक्त केला आहे.
शिवका हिने डीएव्ही औंध येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून एनआयएफटी दिल्ली येथे पदवी प्राप्त केली आहे.
पदवी अभ्यासक्रमात शिवका हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला असेल आता तिची निवड आयआयएमए या प्रतिष्ठित संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून झाली आहे.
व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक्रमात निवड होण्यासाठी शिवका हिने दिवसाचे तब्बल 18- 18 तास अभ्यास केला आहे, अशी माहिती तिचे वडील पंकज खरे यांनी दिली.
शिवकाही औंधची रहिवासी असून तिने आपल्या यशाबद्दल पालकांचे आभार मानले आहेत. त्यांच्याकडून आपल्याला कायम प्रोत्साहन मिळाल्याचे शिव का कृतज्ञतेने सांगते. तिचे वडील पंकज खरे हे स्थापत्य अभियंता आहे निर्मिती एंटरप्राइजेस या नामांकित बांधकाम उद्योगात कार्यरत आहेत. तिची आई गृहिणी असून तिला दोन भाऊ देखील आहेत.