'हा एकनाथ शिंदे यांचा नव्हे तर अमित शहा यांचा सत्कार'
संजय राऊत यांनी केली शरद पवार यांच्यावर देखील टीका
मुंबई: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन करण्यात आलेला सन्मान वास्तविक एकनाथ शिंदे यांचा नसून महाराष्ट्र तोडणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांचा सन्मान आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जायला नको होते, असेही ते म्हणाले.
शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र, ज्यांनी अमित शहा यांच्या मदतीने बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली, महाराष्ट्राशी गद्दारी केली, त्यांच्या सत्कार समारंभाला पवार यांनी जायला नको होते, असे राऊत म्हणाले. तुमचे दिल्लीतील राजकारण काय आहे हे आम्हाला माहीत नाही. मात्र, दिल्लीचे राजकारण आम्हालाही कळते, असेही राऊत यांनी पवार यांना सुनावले.
गद्दारांचा सन्मान करणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का आहे, अशी टीका करून राऊत म्हणाले की, कोण कोणाला टोप्या घालत आहे आणि कोण टोप्या उडवत आहे, हेच काही कळेनासे झाले आहे. कोण कुठे गुगली टाकतो हेही कळत नाही.
Comment List