चर्चच्या परिसरात सापडले हिंदू मंदिराचे अवशेष

चर्चकडून स्थानिकांना धार्मिक विधी करण्याची मुभा

चर्चच्या परिसरात सापडले हिंदू मंदिराचे अवशेष

त्रिवेंद्रम: वृत्तसंस्था 

सध्या देशाच्या अनेक भागात प्रार्थनास्थळांवरून तणाव निर्माण होत असल्याचे चित्र दिसत असताना केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन समुदायाने परस्पर सौहार्दाचे उदाहरण घालून दिले आहे. चर्चच्या जागेत आढळून आलेल्या हिंदू मंदिराच्या अवशेषांच्या जागी धार्मिक विधी करण्याची मुभा चर्चकडून स्थानिक नागरिकांना देण्यात आली आहे. 

पलाय येथे चर्चच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर कसावाची (साबुदाणा बनविण्यासाठी याच्या मुळांचा चीक वापरला जातो) शेती करण्यासाठी नांगरणी केली जात असताना या जमिनीत शिवलिंग व मंदिराचे अवशेष आढळून आले. स्थानिक नागरिकांनी या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री वनदुर्गा भगवती समितीच्या पदाधिकाऱ्यांना त्याबद्दल माहिती दिली. 

समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पलाय बिशप हाऊसच्या धर्मगुरूंची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी देव प्रसन्नम् हा धार्मिक विधी करण्याची मुभा दिली. बिशप हाऊसचे चान्सलर फादर जोसेफ यांनी चर्चच्या जमिनीत हिंदू मंदिराचे अवशेष सापडले असल्याला दुजोरा दिला. स्थानिक हिंदू समुदायाशी चर्चचे सौहार्दपूर्ण संबंध असून ते यापुढे देखील कायम राखले जातील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. 

हे पण वाचा  'आम्ही पोसत होतो दहशतवादी, मात्र तो भूतकाळ आहे'

फादर जोसेफ म्हणाले की, या जागेत पूर्वी मंदिर असल्याचे अनेक जुने लोक सांगत असत. ही जमीन पूर्वी एका ब्राह्मण कुटुंबाकडे होती. त्यानंतर अनेकांकडे हस्तांतरण होत ती चर्चकडे आली. हे मंदिर सुमारे 100 वर्षांपूर्वी नष्ट झाल्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt