वडगाव मावळ प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील बेबडओहळ गावची विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच बिनविरोध पार पडली.सोसायटीच्या चेअरमनपदी सुनिल थोरवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रताप घारे यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त होते.म्हणुन निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.यावेळी सुनिल थोरवे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
हि निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन मनोज ढमाले,प्रतापराव घारे,रवि घारे,विनोद ढमाले,मगन घारे,महेश घारे,गोरख हिंगे,राहुल घारे,संदिप घारे, आदी उपस्थित होते.
Tags:
About The Author

Latest News
09 May 2025 11:44:56
नवी दिल्ली: प्रतिनिधी
'आमची आर्थिक परिस्थिती कमालीची बिकट आहे. त्यातच युद्ध आणि शेअर बाजार ढासळल्याने दुरवस्थेत अधिकच भर पडली आहे....