'प्रामाणिक माणसेच बदलू शकतात व्यवस्था'

मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक संजय नहार यांचे प्रतिपादन

'प्रामाणिक माणसेच बदलू शकतात व्यवस्था'

दिल्ली : प्रतिनिधी 

"प्रामाणिक माणसे इतिहास घडवतात. अशा माणसांचा इतिहास लिहल्यास त्यांच्या कार्याला न्याय मिळतो. हीच माणसे व्यवस्था बदलू शकतात. आणि म्हणूनच व्यवस्था बदलासाठी आपल्या चांगुलपणाची जाणीव होणे महत्वाचे असते,"  असे प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक आणि मुख्य संयोजक संजय नहार यांनी केले.

दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर  आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील छत्रपती संभाजी महाराज खुल्या अभिव्यक्ती मंचावर यावेळी ते बोलत होते. 

यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खुल्या अभिव्यक्ती मंचाचे संयोजक डॉ. शरद गोरे, शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप पाटील, तुकाराम महाराजांचे वंशज रामदास मोरे, कवी युवराज नळे, विक्रम मालन आप्पासो शिंदे, कवी अमोल कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.

हे पण वाचा  'तालकटोरा मैदानात उभारावे मराठा वीरांचे पुतळे'

संजय नहार म्हणाले, "उपेक्षित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी विचारमंच दिलाच पाहिजे. ही साहित्याची प्रचलित व्यवस्था बदलायची असेल तर सामान्य माणसाची लढाई ही सन्मानाची आहे. साहित्यिकांचे विचार आणि कृती सारखी असेल तरच त्याचे समाज व्यवस्थेमध्ये योगदान लाभू शकते. शरद गोरे हे संत नामदेवांच्या मार्गाने विद्रोह करणारे असून साहित्यिकांसाठी त्यांनी हक्काच विचारपीठ निर्माण केले आहे. बंडखोरी ही आपली ताकद आहे. साहित्यिक बंडखोरच असले पाहिजेत. "

प्रदीप पाटील म्हणाले," सत्कार्याचे काम करत असताना लोकं त्याच्यावर शिंतोडे उडवत असतात.  सर्व महापुरुषांनी हा सर्व छळ सहन केला म्हणून त्यांना अमरत्व प्राप्त झालं. साहित्यातून समाज उपयोगी कार्य करत रहा. आपल्या मराठीचा डंका आता साहित्यिकच अटकेपार नेऊ शकतो."

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध साहित्यिक रमेश रेडेकर यांनी केले. प्रास्ताविक मराठा महासंघाचे गणेश दिवेकर यांनी केले. आभार  विक्रम मालन आप्पासो शिंदे यांनी मानले.

"ज्ञानोबांचा जागर या संमेलनात झाला ही अभिमानाची बाब आहे. मात्र संत तुकाराम महाराजांचे सामाजिक आणि साहित्यिक योगदान हे सर्वोच्च असून देखील त्यांची या संमेलनात प्रतिमा किंवा प्रतिकृती कुठेच लावली नाही. त्याचबरोबर कोणत्याच सभामंडपाला त्यांचे नाव देखील दिले नाही. याची खंत आहे." 

      - रामदास मोरे, तुकाराम महाराजांचे वंशज

"हे साहित्य संमेलन अभूतपूर्ण होण्यामागे संजय नहार यांचे योगदान आहे. संमेलन कसे असावे याचा वस्तुपाठ  नहार यांनी देशाला दाखवून दिला. साहित्य संमेलनाचा हेतू हा माणसांना जोडणारा असावा. साहित्य क्षेत्रातील विपरीत गोष्टी बाजूला काढून साहित्य क्षेत्रात शुद्धीकरण करण्याचं काम संजय नहार यांनी केले."
   - डॉ. शरद गोरे, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद.

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

श्री विघ्नहर साखर कारखान्यावर सत्यशील शेरकर यांची निर्विवाद सत्ता
कुसुमाग्रज स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट
'आत्मघातकी पथकाच्या हल्ल्यात नव्वद पाक सैनिक ठार'
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
मंत्रीपद मिळू न देणाऱ्यांना देणार 'असे' चोख प्रत्युत्तर
हनुमंत चिकणे मानद डॉक्टरेटने सन्मानित 
उद्धव ठाकरे गटाचे खासदार भाजप आमदारांच्या भेटीला
यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका: शर्मन जोशी
'तालकटोरा मैदानात उभारावे मराठा वीरांचे पुतळे'
'हे सगळे नेते तयार झाले तुमच्याच तालमीत... '