सत्तेशिवाय जनतेची कामे होत नाहीत म्हणून...

रवींद्र धंगेकर करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश

सत्तेशिवाय जनतेची कामे होत नाहीत म्हणून...

पुणे: प्रतिनिधी 

काँग्रेसचे बहुचर्चित माजी आमदार रवींद्र धंगेकर अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. सत्तेशिवाय जनतेची कामे होत नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते आणि मतदारांना विश्वासात घेऊन आपण निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी सात वाजता पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, असे धंगेकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. 

काँग्रेसमध्ये आपण दहा-बारा वर्ष काम केले. पक्षात एकमेकांशी कौटुंबिक नाते निर्माण होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आपल्याला भरभरून प्रेम दिले. त्यांची ताकद आपल्या पाठीशी उभी केली. त्यामुळे काँग्रेस सोडताना खूप वाईट वाटत आहे. मात्र, सत्तेशिवाय जनतेची कामे होत नाहीत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्याला खूप मदत केली आहे. मंत्री उदय सामंत यांनी देखील भेट घेऊन, आमच्याबरोबर काम करा, असे सांगितले आहे. त्यामुळे आज संध्याकाळी शिंदे यांच्याबरोबर होणाऱ्या भेटीत अंतिम निर्णय घेऊ, असे धंगेकर यांनी सांगितले. 

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर तब्बल 27 वर्षांनी कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत धंगेकर हे 'जाएंट किलर' ठरले होते. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक ही लढवली. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. सर्वसामान्यांसाठी झटणारा कार्यकर्ता, अशी धंगेकर यांची प्रतिमा आहे. महापालिका निवडणुका काही महिन्यांवर आले असताना धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम करणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. 

हे पण वाचा  'प्रा डॉ मंगल डोंगरे यांचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान'

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

पाकिस्तानात हाहा:कार, कराची बेचिराख पाकिस्तानात हाहा:कार, कराची बेचिराख
नवी दिल्ली: प्रतिनिधी  काल संध्याकाळी भारताच्या विविध लष्करी तळांवर हल्ले करून पाकिस्तानने काढलेल्या कुरपतीचे अपेक्षेपेक्षा अधिक वाईट फळ पाकिस्तानला भोगावे...
इस्लामाबादसह पाकिस्तानच्या सात शहरांवर ड्रोन हल्ले
पाकिस्तानचा जम्मू विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला
सुदर्शनचक्राने केले पाक हवाई हल्ल्यापासून भारताचे संरक्षण
लाहोरपाठोपाठ कराचीतही भर दिवसा धमाका
शुभमन गिलच्या गळ्यात पडणार कसोटी कर्णधार पदाची माला
‘सोमेश्वर फाउंडेशन’तर्फे 'पुणे आयडॉल’ स्पर्धा १९ मेपासून 

Advt