Mahabodhi Temple News | महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्याचा आमचा निर्धार!

नाशिक मधील ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा निर्धार

Mahabodhi Temple News | महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्याचा आमचा निर्धार!

नाशिक/ मुंबई : महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली ते बिहार मधील बुद्धगया जगातील सर्व बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे.बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांचे आहे.महाबोधी टेम्पल कायदा रद्द करून  महाबोधी महाविहार च्या व्यवस्थापन समिती मध्ये सर्व विश्वस्त   बौद्ध धम्माचे नियुक्त करावेत.महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या हा आज ऐतिहासिक धम्म परिषदेत मंजूर ठराव बिहार च्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कळवणार आहे.तसेच लवकरच बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्याचा आपला निर्धार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

अडीच हजार वर्षांपुर्वी भगवान गौतम बुद्धांनी भारतात लोकशाहीचा पाया रचला. जगाला शांतीचा विचार दिला. हाच विचार जगातील सर्वच मोठ्या देशांमध्ये रुजला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच लोकशाहीचे प्रतिक असून त्यांनी संविधानाची निर्मिती केली आहे. संविधानाला हात लावण्याची कोणाची हिंमत नाही, पण कोणी हात लावल्यास त्याला सोडणार नाही, असा इशारा  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिला.

श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या 95 व्या वर्धापन दिनानिमित्त देश-विदेशातील भिक्खु संघाच्या अनुयायांच्या उपस्थितीत रविवारी दि. 2 मार्च रोजी नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदानावर बौध्द धम्म परिषद ना.रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी  ना.रामदास आठवले आणि यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले यांचा भव्य  सत्कार करण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आणि धम्म परिषदेचे स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे; राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; राज्य कार्याध्यक्ष बाबूराव कदम; रमेश मकासरे;अशोक गायकवाड; सुरेश बार्शिंग;पप्पू कागदे श्रीकांत भालेराव; सिद्धार्थ कासारे;विजय आगलावे ; सूर्यकांत वाघमारे ; दयाळ बहादूर; युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशन चे अध्यक्ष अविनाश कांबळे ; अनिलभाई गांगुर्डे; सौ.शिलाताई गांगुर्डे; आयआरएस समीर वानखेडे, अभिनेत्री क्रांती रेडकर-वानखेडे, भूषण लोंढे  दीक्षाताई लोंढे ; मनालीताई जाधव; अण्णा रोकडे; अण्णा वायदंडे; नाना बागुल; संजय पवार; सिद्राम ओव्हाळ; सुरेंद्र थोरात; आशाताई लांडगे; सौ.नैनाताई वैराट; स्वप्नाली जाधव; यांच्या सह 8 देशांतील बौध्द भिक्खुसंघाचे अनुयायी तसेच हजारो बौध्द अनुयायी उपस्थित होते.भदंत सुगत महाथेरो ; भदंत राहुल बोधी महथेरो; भदंत संघरत्न यांनी अनेक ठरावांचे वाचन केले.

बुध्दगया येथे भगवान बुध्दांना ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानच जगात श्रेष्ठ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाचीच प्राप्ती केली म्हणून त्यांना संविधान लिहिण्याचा अधिकार मिळाला. 2 मार्च 1930 रोजी बाबासाहेबांनी काळाराम सत्याग्रह केला, मंदिर प्रवेशासाठी ते लढत नव्हते तर संपूर्ण मानव जातीच्या हक्कासाठी ते लढत होते. त्याकाळी दलिताना काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला नाही मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीमुळे आज मला काळाराम मंदिरात मानाने प्रवेश करण्याची संधी मिळाली . पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल  ना.रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे यावेळी आभार मानले. बँकॉक पट्टाया च्या धर्तीवर नाशिक मध्ये सुद्धा एखाद्या डोंगरावर भगवान बुद्धांची मूर्ती कोरून बौद्ध पर्यटन स्थळ उभारण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे अशी सूचना ना.रामदास आठवले यांनी यावेळी केली.

स्वागताध्यक्ष प्रकाश लोंढे, समीर वानखेडे, क्रांती रेडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. बौध्द भिक्खु संघाने यावेळी बुध्दगया येथील भगवान बुध्दांचे परमपवित्र स्थान बौध्द भिक्खु संघाच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us