सुवर्णा पवार या उत्कृष्ट बालस्नेही विभागीय उपायुक्त  

महिला व बालकल्याण विभागाकडून सन्मानित

सुवर्णा पवार या उत्कृष्ट बालस्नेही विभागीय उपायुक्त  

पुणे: प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागांतर्गत बालहक्क संरक्षण आयोग यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या बालकांकरीता उत्कृष्ट  कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यामध्ये अनेक  जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी यांना सन्मानित करण्यात आले.

महीला व बाल विकास विभाग अंतर्गत सुवर्णा पवार यांना कोकण विभागातून उत्कृष्ट उपायुक्त या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुवर्णा पवार या बालकांच्या क्षेत्रात अनेक वर्षापासून काम करीत असून महिला व बालविकास विभागामध्ये त्या उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांनी अनाथ निराधार आणि निराश्रित बालकांसाठी उन्हाळी सुट्टीमध्ये  मामाच गाव ही अभिनव कल्पना राबवून मुलांसाठी उन्हाळ्यात शिबिरे आयोजित केली होती. सदर शिबिरांमध्ये कौशल्य विकास, विविध प्रकारचे खेळ, विविध प्रकारच्या करमणुकीचे कार्यक्रम यांच्या माध्यमातून मुलांची कला कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

जी मुले पूर्ण अनाथ आहेत, संस्थेमधून  कधीही नातेवाईक किंवा  आपल्या घरी जाऊ शकत नाहीत, त्यांना मुंबईतील चिल्ड्रन्स एड सोसायटी या संस्थांमध्ये बोलवून आजोळ सारखी, मामाच्या गावा सारखी मजा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती . राजभवनात मुलांची सहल काढून मुलांना  आनंदी ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले होते.

त्यांच्या विभागातील इतर सर्व प्रकारच्या प्रशासकीय कामाची दखल घेऊन त्यांना बालस्नेही पुरस्काराने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शहा व राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, विधान परिषदेच्या सदस्या मनीषा कायंदे व इतर मान्यवर उपस्थित होते. सुवर्णा पवार या साहित्यिक, लेखिका, कवयित्री असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us