सेन्सॉर बोर्डाच्या निषेधार्थ होणार अभिनव आंदोलन

मंगळवारी रंगणार 'नामदेव तुझा बाप' कार्यक्रम 

सेन्सॉर बोर्डाच्या निषेधार्थ होणार अभिनव आंदोलन

पुणे : प्रतिनिधी

भारतीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाने विद्रोही कवी, पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ कवी, लेखक, कलाकार व आंबेडकरी चळवळीतील  कार्यकर्त्यांच्या वतिने अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. 'नामदेव तुझा बाप - नामदेव ढसाळ यांच्या कविता व लेखनांचे वाचन' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सेन्सॉर बोर्डाचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती सम्यक साहित्य संमेलन, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी दिली. 

हल्लाबोल चित्रपटातील ढसाळ यांच्या कविता वगळण्याची अट घालण्याबरोबरच, 'कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही,' असे उद्दाम उद्गार बोर्डाच्या सदस्यांनी काढल्याने साहित्य क्षेत्र आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

'नामदेव तुझा बाप - नामदेव ढसाळ यांच्या कविता व लेखनांचे वाचन'  या अभिनव आंदोलनाबद्दल अधिक माहिती देताना परशुराम वाडेकर म्हणाले,  मंगळवार दि . ४ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ वा. कलाकार कट्टा, गुडलक चौक येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात  दंगलकार नितीन चंदनशिवे,  सुमित गुणवंत, सागर काकडे, हृद‌मानव अशोक,  रमणी सोनवणे, अशोक घोडके, स्वप्नील चोधरी, हर्षनंद सोनवणे, रवी कांबळे,  जित्या जाली, देवा झिंजाड, विठ्ठल गायकवाड,  म.भा. चव्हाण, विजय बडेवार, अंजली कुलकर्णी,  सुरेश वैराळकर आकाश सोनवणे यांच्यासह मान्यवर साहित्यिक, कवी, पत्रकार सहभागी होऊन नामदेव ढसाळ यांच्या कविता आणि लेखनांचे वाचन करणार असल्याचे वाडेकर यांनी सांगितले.  

हे पण वाचा  'समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही'

डॉ. बासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव  दिपक म्हस्के, डॉ. राजाभाऊ भैलुमे, प्रा. किरण सुरवसे, डॉ. निशा भंडारे, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर, डॉ. स्वप्निल गायकवाड, प्रा. रमा करोते-सुर्यवंशी आदि यं अभिनव आंदोलनाचे निमंत्रक आहेत.

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअर वर्षाअखेरीस कार्यान्वित पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअर वर्षाअखेरीस कार्यान्वित
  मुंबई : स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येकी 25 टक्के
'भारतातील जनता नाही तर नेतेच जातीयवादी'
'सुशांतसिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच'
पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही - अशोक सराफ
समाजाचा ढळलेला तोल सावरण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे स्मरण आवश्यक!
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का? : हर्षवर्धन सपकाळ
औंध रुग्णालयाच्या आवारात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे

Advt