Ram Satpute | राम सातपुते यांच्या प्रयत्नांना यश, माचनूर शाखा क्र 2 उन्हाळी हंगामासाठी कायमस्वरूपी पाणी कोटा मंजूर!
प्रतिनिधी : निरा उजवा कालवा विभाग फलटण अंतर्गत पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग क्र 4 माचनूर अंतर्गत शाखा क्र 2 साठी उन्हाळी हंगामामध्ये कायमस्वरूपी पाणी कोटा मंजूर करण्याबाबत माळशिरसचे मा आ राम सातपुते यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन पत्र देऊन या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या होत्या यावर राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भागातील शेतकऱ्यांसाठी तात्काळ कायमस्वरूपी पाणी कोटा मंजूर व्हावा अशी कारवाई करण्याचे आदेश दिल्याने या भागातील शेतकऱ्यातून समाधान व्यक्त केले जात आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, निरा उजवा कालवा फलटण विभागाअंतर्गत माचनूर उपविभाग शाखा क्रमांक 2 मधील पाणी वापर संस्थेने 16 हजार 600 हेक्टर क्षेत्र अधिसूचित केले आहे परंतु शाखा क्र 2 ला उन्हाळा हंगामासाठी इतर वेळेस साधारणपणे 8000 क्युसेस पाणी मंजूर होते त्या ऐवजी 12000 क्युसेस पाणी मंजूर करावे जेणेकरून उन्हाळा हंगामामध्ये शेतकऱ्यांना 2 आवर्तने मिळतील तसेच शाखा क्र 2 हे माचनूर उपविभागाला जोडल्यामुळे बारमाही ब्लॉक पद्धत बंद होऊन आठमाही ब्लॉक पद्धत झाली त्यामुळे शाखा क्र 2 मधील क्षेत्र हे माळशिरस तालुक्यामधील असताना देखील माचनूर उपविभागाला जोडल्यामुळे दोन आवर्तनाऐवजी एक आवर्तन मिळत आहे शाखा क्र 2 हे बारमाही करावं जेणेकरून माळशिरस तालुक्यामधील तांदुळवाडी, मळोली फळवणी, कोळेगाव ,धानोरे, शेंडेचिंच व तोंडले या गावातील शेती ही बागायत होईल व या गावांना बारमाही पाणी मिळणार आहे
माचनूर शाखा क्र 2 उन्हाळी हंगामासाठी कायमस्वरूपी पाणी कोटा मंजूर होण्याबाबत मा आ राम सातपुते यांनी प्रयत्न केल्याने जलसंपदा मंत्री महोदयांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याने आमच्या शेतीच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटणार आहे गेले कित्येक वर्ष प्रलंबित असणारा प्रश्न मा आ राम सातपुते यांनी सोडविल्याने आमच्या शेती उत्पन्नात वाढ होणार आहे यामुळे या भागातील शेतकरी समाधानी आहेत. सचिन पाटील ,शेतकरी फळवणी
000
Comment List