इसिस आणि आयएसआयची अभद्र युती

अजित दोभाल यांचा प. बंगाल दौरा

इसिस आणि आयएसआयची अभद्र युती

देशाचे मुख्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांनी नुकताच प बंगालचा दौरा केला. अर्थातच या दौऱ्याबाबत पूर्ण गुप्तता पाळली गेली. सुरक्षा यंत्रणा वगळता इतर सर्व शासकीय आस्थापने, प्रसारमाध्यमे यांना या दौऱ्याची कुनकूणही लागू दिली गेली नाही. या दौऱ्या मागचे कारणही तेवढेच महत्त्वाचे आहे. ते म्हणजे पाकिस्तान स्वतः आर्थिक, राजकीय, सामाजिक संकटात असून देखील पाकिस्तानचे, विशेषतः पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा आयएसआयचे भारतात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न थांबलेले नाहीत. उलट आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयएसआयएस आणि आयएसआय यांची अभद्र युती भारतात मूलतत्ववादी इस्लामी प्रदेश निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. काश्मीर आणि बंगालवर त्यांचा डोळा आहे. 

इसिस या दहशतवादी संघटनेने जगभरात मूलतत्त्ववादी इस्लामिक प्रदेश स्थापन करण्याची रणनीती अवलंबण्याचा निर्णय घेतला. आयएसआयने तातडीने इसिसशी संपर्क साधून या कामात सहकार्य देण्याचे कबूल केले. भारतात तीन ठिकाणी अशाप्रकारे कट्टर इस्लामिक प्रदेश स्थापन केले जाऊ शकतात, असे आयएसआयने इसिसच्या निदर्शनास आणून दिले. त्यापैकी पहिला प्रदेश अर्थातच काश्मीर, दुसरा पश्चिम बंगाल आणि हीच चळवळ पुढे वाढवत ईशान्य भारतापर्यंत नेणे, अशी योजना आयएसआयने इसिसच्या गळी उतरवली. 

त्या दृष्टीने इसिस आणि आयएसआयने पश्चिम बंगाल सह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि आसाम या राज्यात आपले स्लीपर सेल कार्यान्वित केले. युसुफ अल हिंदी, अन्सार उल तोहीद आणि हरकत उल हरब ए इस्लामी अशा तीन संघटना 2019-20 मध्ये स्थापन करण्यात आल्या. त्यांनी भारताच्या विविध राज्यांमध्ये इस्लामी मूलतत्ववादाचा फैलाव करून आपले अनुयायी तयार केले आहेत. सन 2023 पासून त्यांच्या कारवायांना वेग आलमा. मात्र, या तीनही संघटनांपैकी कोणीही काश्मीरमध्ये शिरले नाही. काश्मीरसाठी वेगळीच योजना तयार होती.

काश्मीरमध्ये आयएसआय आणि इसिस यांनी एकत्र येऊन ग्लोबल इस्लामिक कौन्सिल नावाची संस्था स्थापन केली आहे. वरवर पाहता ही संस्था एक माध्यम समूह आणि सामाजिक कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे. मात्र या बुरख्याआड काश्मीरमध्ये इस्लामी मूलतत्त्ववाद पसरविण्याचे कार्य केले जाते. हुरियत कौन्सिलसह सर्व फुटीरतावादी गटांचा कौन्सिलला पाठिंबा आहे. काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करायचे. मात्र, त्याला पाकिस्तानशी जोडायचे नाही. तर इसिसच्या योजनेप्रमाणे जगातील पहिला इस्लामिक कट्टरतावादी प्रदेश म्हणून तयार करायचे, अशी आयएसआयएस आणि आयएसआयची योजना आहे. 

याच धर्तीवर बंगालमध्ये देखील इस्लामिक स्टेट ऑफ बंगाल स्थापन करण्याचा आयएसआयएस आणि आयएसआयचा डाव आहे. आपल्या कट्टरतावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी बंगालमध्ये 'अल बगाली मीडिया'ची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून कट्टरतावाद आणि फुटीरतावादाचा प्रचार करणारी उर्दू पत्रके प्रसिद्ध करण्यासाठी. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी हस्तगत केली. पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र इस्लामिक कट्टरतावादी प्रदेश निर्माण करणे आणि हेच वातावरण ईशान्य भारतापर्यंत वाढवत नेणे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे. 

बंगालमध्ये निर्माण झालेल्या अराजकाच्या पार्श्वभूमीवर भारतात बांगलादेशी घुसकरांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र आणि विविध राज्यांच्या सरकारांनी देखील घुसखोर बांगलादेशींच्या विरोधात मोहिमा हाती घेतल्या आहेत. त्यातच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या देशातील नामवंत संस्थेच्या माध्यमातून अनधिकृत स्थलांतरण आणि त्याचे राजकीय, आर्थिक, सामाजिक परिणाम या विषयावर अहवाल सादर केला आहे. त्यात विशेषतः बांगलादेशी घुसखोरांमुळे देशात निर्माण झालेल्या समस्येचा सखोल उहापोह केला आहे. 

या सर्व पार्श्वभूमीवर अजित दोभाल यांनी बंगालला भेट देऊन सर्व महत्त्वाच्या सुरक्षा यंत्रणा प्रतिनिधींची भेट घेतली आहे. या भेटीत बंगालमध्ये आयएसआय आणि आयएसआयएसचा कट म्हणून पाडण्याची प्रभावी योजना दोभाल यांच्या बंगाल दौऱ्यात आखण्यात आली आहे. इतर तीन संघटनांच्यादेखील राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राष्ट्रीय गुप्तचर संस्था असलेल्या आयबीने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुस्क्या आवळल्या आहेत. 

 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us