'मराठी हीच महाराष्ट्राची भाषा'
भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची भूमिका
मुंबई: प्रतिनिधी
मराठी हीच महाराष्ट्राची भाषा आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या वतीने सभागृहात व्यक्तबोलताना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ पदाधिकारी भैय्याजी जोशी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना, मुंबईत अनेक भाषा बोलल्या जातात. मुंबईची कोणतीही एक भाषा नाही. मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे असे काही नाही, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून विशेषतः राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी याबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. मराठी हीच महाराष्ट्राची भाषा आहे. शासनाची भाषा आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकले पाहिजे. मराठी भाषेवर आमचे प्रेम आहे. अर्थात आम्ही इतर भाषांचा अवमान करणार नाही. जो माणूस स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तो इतर भाषांचाही आदर करतो, असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील भैय्याजी जोशी यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजकारण करताना आपण देखील मराठी आहोत, याची जाणीव जोशी बुवांनी ठेवावी, असे ते म्हणाले. जोशी यांच्या वक्तव्याचा मनसेच्या वतीने त्यांनी तीव्र निषेध केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
Comment List