कर थकबाकी दारांवर जप्तीची कारवाई करण्याचा वडगाव नगरपंचायतीचा इशारा

३१ मार्चपर्यंत शंभर टक्के मिळकत कर वसूल करण्याचे नगरपंचायतीचे उद्दिष्टं; मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम

कर थकबाकी दारांवर जप्तीची कारवाई करण्याचा वडगाव नगरपंचायतीचा इशारा

वडगाव मावळ /प्रतिनिधी 

वडगाव नगरपंचायत हद्दीतील थकित मालमत्ता कर व पाणी पट्टी यांच्या वसुलीसाठी वडगाव नगरपंचायतीने धडक मोहीम आखली असुन जे नागरिक थकित आहेत त्यांच्यावर धडक जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ प्रवीण निकम यांनी दिला आहे. तर तोडण्यात आलेले नळ कनेक्शन परस्पर जोडुन पाण्याचा वापर करणाऱ्या नागरिकांकडुन दंड वसुलीचाही इशारा दिला आहे.

वडगाव नगरपंचायतीची घरपट्टी कराची वार्षिक मागणी ९ कोटी रुपये असून आतापर्यंत त्यापैकी २ कोटी ८५ लाख रुपये वसूल झाले आहेत, तसेच पाणीपट्टी कराची वार्षिक मागणी ९ कोटी ४६ लाख रुपये असून आतापर्यंत त्यापैकी ६० लाख रुपये कर वसुली झाली आहे. दोन्ही मिळून अद्याप ७ कोटी रुपये कर येणे बाकी आहे.चालू आर्थिक वर्ष संपत आल्याने नगरपंचायतीने ३१ मार्चपर्यंत शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे

थकबाकीवर दोन टक्के व्याजदर लावण्यात येणार

'सद्यःस्थितीमध्ये ज्या  मिळकतधारकांची थकबाकी आहे. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांचे नळजोड तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे, तसेच थकबाकीवर दोन टक्के दंड लावण्यात येणार आहे कर वसुलीसाठी पाच पथके तयार करण्यात आली असून ती घरोघरी जाऊन नागरिकांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. फिरत्या गाडीतून ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

*कर भरण्यासाठी आँनलाईन सुविधा.. 

नगरपंचायत कार्यालयात येऊन मिळकतधारक सुटीच्या दिवशी म्हणजे शनिवारी आणि रविवारीदेखील कर भरू शकता, तसेच ऑनलाइन पद्धतीनेही कर भरण्याची सुविधा आहे. त्यासाठी बिलावरील क्यूआर कोड स्कॅन करून व www.npvadgaon.in या वेबसाइटवर जाऊन गुगल पे, फोन पे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आदींचा वापर करून कर भरणा करता येईल. कर बिलाबाबत तक्रार असल्यास नगरपंचायत कार्यालयात अर्ज देऊन तत्काळ बिल दुरुस्ती करता येईल.

कोणावरही कारवाई करण्याची इच्छा नाही; परंतु आवाहन करूनही प्रतिसाद न देणाऱ्या मिळकतधारकांवर नाइलाजाने कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे. नागरिकांनी त्वरित कर भरणा करून सहकार्य करावे

डॉ. प्रवीण निकम, प्रशासक तथा मुख्याधिकारी, वडगाव नगरपंचायत.

Share this article

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Post Comment

Comment List

Follow us