निवडणूक सह्याद्री साखर कारखान्याची पण पेरणी मात्र नगरपरिषद निवडणुकीची!

उमेदवारी निवडीवरून रहिमतपूर शहरात नाराजीच्या राजकीय घडामोडी

निवडणूक सह्याद्री साखर कारखान्याची पण पेरणी मात्र नगरपरिषद निवडणुकीची!

सह्याद्री साखर कारखाना निवडणूक (भाग 1 - रहिमतपूर विभाग)

शशिकांत क्षीरसागर / रहिमतपूर

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या रहिमतपूर शहरांमध्ये  कारखान्याच्या निवडणुकीचे वारे वाहत असले तरी पेरणी मात्र आगामी नगरपरिषद निवडणुकीची सर्व पक्षाचे प्रमुख नेते मंडळी अंतर्गत करीत असल्याचे चित्र आहे व तशी चर्चा सुद्धा चौका चौकात सुरू असताना दिसत आहे  शहरांमध्ये भाजपाचे आमदार मनोज दादा घोरपडे व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम, नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते निलेश माने व शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांचे राजकीय गट महायुतीच्या माध्यमातून कार्यरत आहेत तर दुसरीकडे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ते विद्यमान कारखान्याचे संचालक अविनाश माने यांचा गट प्रत्यक्षात राजकीय पटलावर दिसत नसला तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून कारखान्याच्या निवडणुकीत सक्रिय झाल्याचे चित्र शहरात आहे.

विधानसभा निवडणुकीत शहरांमध्ये महायुतीने मतदानामध्ये मोठे यश मिळवले आहे त्यामुळे साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे शहरात आमदार मनोज दादा घोरपडे यांनी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे शहरांमध्ये कारखान्याचे 926 सभासद मतदार म्हणून आहेत त्यामुळे शहराला निवडणुकीत फार महत्व निर्माण झाले आहे महायुतीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात चित्रलेखा माने कदम यांच्या माध्यमातून सोसायटीचे चेअरमन विक्रम व्यंकट माने यांनी अर्ज दाखल केला आहे तर नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते निलेश माने व त्यांचे सहकारी सतीश गुलाबराव भोसले यांनी माजी नगरसेवक शंकरराव भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थिती दाखवली होती तर माजी नगराध्यक्ष वासुदेव माने व कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार माने पाटील यांनी सुखदेव माने यांचा उमेदवार अर्ज दाखल केला आहे हे सर्वजण महायुतीचे नेतेमंडळी असली तरी उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यामध्ये एक संघपणा दिसून न आल्याची चर्चा सभासदांमध्ये चालू आहे नुकताच भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चित्रलेखा माने कदम यांच्या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली होती यावेळी नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते निलेश माने अनुपस्थित दिसत होते मात्र त्यांच्या घरी मंत्री बावनकुळे यांनी भेट दिली त्यावेळी ते घरी उपस्थित होते याची चर्चाही या निवडणुकीच्या निमित्ताने शहरात चालू आहे,

त्याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही अशा प्रकारचे राजकीय वातावरण असले तरी विधानसभेप्रमाणे सर्वांचा राजकीय विरोधक एकच असल्यामुळे आमदार मनोज दादा घोरपडे सर्व सभासद मतदारांना नेते मंडळींना विचारात घेऊन एकसंघ  मोट बांधतील व त्या पद्धतीने बारकाईने लक्ष ठेवून त्यांनी राजकीय प्रक्रिया सुरू केल्याची समजते त्यांच्या विचारांपुढे कोणी जाणार नाहीत व सक्षम उमेदवार निवडून त्यापैकी एकच अर्ज कायम ठेवला जाईल एवढे मात्र निश्चित आहे‌. दुसरीकडे सत्ताधारी पॅनलचे प्रमुख माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व माजी मंत्री पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ते विद्यमान संचालक अविनाश माने हे निवडणूक वातावरणात सक्रिय झाले असले तरी दुसरीकडे सत्ताधारी गटाकडून विद्यमान संचालक अविनाश माने व सुनील माने यांचे चुलत बंधू माजी नगरसेवक रमेश माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत रमेश माने यांनी गेली पाच पंचवार्षिक निवडणुकीत माघार घेतली होती त्यामुळे यावेळी तरी उमेदवारी मिळावी ही त्यांच्या अपेक्षा दिसून येत आहे तर दुसरीकडे अविनाश माने यांचे कार्यकर्ते उमेदवारी आम्हालाच मिळेल या आशेवर आहेत त्या पद्धतीने प्रचाराचे काम सुद्धा त्यांनी सुरू केलेले आहे अशा वातावरणात यांच्या गटातूनच माजी संचालक प्राध्यापक भानुदास भोसले यांच्या घरातील नगरसेवक शशिकांत भोसले उमेदवारीसाठी फार इच्छुक होते अर्ज दाखल करण्यासाठी अगोदर त्यांनी सभासदांच्या मध्ये चाचणी सुद्धा शहरात केली होती,

हे पण वाचा  विरोधी गटाचे मताधिक्य रोखण्याचे सत्ताधारी गटाकडे मोठे आव्हान!

परंतु माशी कुठे शिंकली हेच सभासदांना समजले नाही त्यांनी अर्ज दाखल केला नाही याचीही उलट सुलट चर्चा सभासद मध्ये चालू आहे दरम्यान सुनील माने यांच्या जवळचे कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार माने पाटील त्यांचे काही कार्यकर्ते  विरोधी पक्षातील उमेदवार सुखदेव माने यांचा अर्ज दाखल करणे वेळी  उपस्थित होते त्यामुळे सुनील माने कारखान्यापेक्षा आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीचा काही तोटा होणार नाही याची काळजी घेताना दिसून येत आहेत एकीकडे चुलत बंधू व दुसरीकडे नगर परिषदेतील सहकारी अविनाश माने उमेदवारीसाठी इच्छुक असल्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था झाली आहे त्यातच विधानसभा निवडणुकीच्या अजितदादा पवार गटाबरोबर जाण्याचा दबाव त्यांच्या कार्यकर्त्यांचा होता तरीसुद्धा माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या भूमिकेबरोबर राहून फार मोठा राजकीय त्याग केल्याचे त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत त्यामुळे भविष्यातील राजकारण एक संघ राहण्यासाठी  उमेदवारीबाबत सर्वस्वी कोणता निर्णय सुनिल माने व  बाळासाहेब पाटील घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले तसेच नहरवाडी विभागातील दिलीप कदम रमेश कदम अनिल गायकवाड शिवसेना उद्धव गटाचे किरण भोसले यांची सुद्धा भूमिका महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे दिनांक 21 मार्च हा दिवस उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल त्या अगोदर आमदार मनोज दादा घोरपडे व माजी मंत्री बाळासाहेब पाटील अशा आपापल्या गटातील नाराजीवर कसा मेळ घालतात यावर शहरातील कारखान्याचा राजकीय निवडणुकीचा आखाडा रंगणार एवढे मात्र निश्चित सत्ताधारी गटाकडून विद्यमान संचालक अविनाश माने व सुनील माने यांचे चुलत बंधू माजी नगरसेवक रमेश माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत रमेश माने यांनी गेली पाच पंचवार्षिक निवडणुकीत माघार घेतली होती त्यामुळे यावेळी तरी उमेदवारी मिळावी ही त्यांच्या अपेक्षा दिसून येत आहे तर दुसरीकडे अविनाश माने यांचे कार्यकर्ते उमेदवारी आम्हालाच मिळेल या आशेवर आहेत त्या पद्धतीने प्रचाराचे काम सुद्धा त्यांनी सुरू केलेले आहे

अशा वातावरणात यांच्या गटातूनच माजी संचालक प्राध्यापक भानुदास भोसले यांच्या घरातील नगरसेवक शशिकांत भोसले उमेदवारीसाठी फार इच्छुक होते अर्ज दाखल करण्यासाठी अगोदर त्यांनी सभासदांच्या मध्ये चाचणी सुद्धा शहरात केली होती परंतु माशी कुठे शिंकली हेच सभासदांना समजले नाही त्यांनी अर्ज दाखल केला नाही याचीही उलट सुलट चर्चा सभासद मध्ये चालू आहे दरम्यान सुनील माने यांच्या जवळचे कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार माने पाटील त्यांचे काही कार्यकर्ते  विरोधी पक्षातील उमेदवार सुखदेव माने यांचा अर्ज दाखल करणे वेळी  उपस्थित होते त्यामुळे सुनील माने कारखान्यापेक्षा आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीचा काही तोटा होणार नाही याची काळजी घेताना दिसून येत आहेत एकीकडे चुलत बंधू व दुसरीकडे नगर परिषदेतील सहकारी अविनाश माने उमेदवारीसाठी इच्छुक असल्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था झाली आहे त्यातच विधानसभा निवडणुकीच्या अजितदादा पवार गटाबरोबर जाण्याचा दबाव त्यांच्या कार्यकर्त्यांचा होता तरीसुद्धा माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या भूमिकेबरोबर राहून फार मोठा राजकीय त्याग केल्याचे त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत त्यामुळे भविष्यातील राजकारण एक संघ राहण्यासाठी उमेदवारीबाबत सर्वस्वी कोणता निर्णय सुनिल माने व  बाळासाहेब पाटील घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तसेच नहरवाडी विभागातील दिलीप कदम रमेश कदम अनिल गायकवाड शिवसेना उद्धव गटाचे किरण भोसले यांची सुद्धा भूमिका महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे दिनांक 21 मार्च हा दिवस उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल त्या अगोदर आमदार मनोज दादा घोरपडे व माजी मंत्री बाळासाहेब पाटील अशा आपापल्या गटातील नाराजीवर कसा मेळ घालतात यावर शहरातील कारखान्याचा राजकीय निवडणुकीचा आखाडा रंगणार एवढे मात्र निश्चित झाले असले तरी सत्ताधारी गटाकडून विद्यमान संचालक अविनाश माने व सुनील माने यांचे चुलत बंधू माजी नगरसेवक रमेश माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत

रमेश माने यांनी गेली पाच पंचवार्षिक निवडणुकीत माघार घेतली होती त्यामुळे यावेळी तरी उमेदवारी मिळावी ही त्यांच्या अपेक्षा दिसून येत आहे तर दुसरीकडे अविनाश माने यांची कार्यकर्ते उमेदवारी आम्हालाच मिळेल या आशेवर आहेत त्या पद्धतीने प्रचाराचे काम सुद्धा त्यांनी सुरू केलेले आहे अशा वातावरणात यांच्या गटातूनच माजी संचालक प्राध्यापक भानुदास भोसले यांच्या घरातील नगरसेवक शशिकांत भोसले उमेदवारीसाठी फार इच्छुक होते अर्ज दाखल करण्यासाठी अगोदर त्यांनी सभासदांच्या मध्ये चाचणी सुद्धा शहरात केली होती परंतु माशी कुठे शिंकली हेच सभासदांना समजले नाही त्यांनी अर्ज दाखल केला नाही याचीही उलट सुलट चर्चा सभासद मध्ये चालू आहे दरम्यान सुनील माने यांच्या जवळचे कारखान्याची माजी संचालक नंदकुमार माने पाटील त्यांचे काही कार्यकर्ते  विरोधी पक्षातील उमेदवार सुखदेव माने यांचा अर्ज दाखल करणे वेळी  उपस्थित होते त्यामुळे सुनील माने कारखान्यापेक्षा आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीचा काही तोटा होणार नाही याची काळजी घेताना दिसून येत आहेत एकीकडे चुलत बंधू व दुसरीकडे  अविनाश माने उमेदवारीसाठी इच्छुक असल्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था झाली आहे त्यातच विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अजितदादा पवार गटाबरोबर जाण्याचा दबाव त्यांच्या कार्यकर्त्यांचा होता तरीसुद्धा माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या भूमिकेबरोबर राहून फार मोठा राजकीय त्याग केल्याचे त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत त्यामुळे भविष्यातील राजकारणात एक संघ राहण्यासाठी उमेदवारीबाबत सर्वस्वी कोणता निर्णय  सुनिल माने व बाळासाहेब पाटील घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तसेच नहरवाडी विभागातील दिलीप कदम ,रमेश कद, अनिल गायकवाड शिवसेना उद्धव गटाचे किरण भोसले यांची सुद्धा भूमिका महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे दिनांक 21 मार्च हा दिवस उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा आहे त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल त्या अगोदर आमदार मनोज दादा घोरपडे व माजी मंत्री बाळासाहेब पाटील आपापल्या गटातील नाराजीवर कसा मेळ घालतात यावर शहरातील कारखान्याचा राजकीय निवडणुकीचा आखाडा रंगणार एवढे मात्र निश्चित  आहे. 

000

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'भाजपची स्क्रिप्ट वाचून मंत्रिपदाची किंमत चुकवता का?'
नागपूर दंगल सरकारपुरस्कृत आहे म्हणावे का?
BARTI news | वेबसाईट द्वारे महाडचा सत्याग्रह आता मराठीसह कन्नड भाषेतही!
'ऊसतोडणी कामगारांसाठी एक खिडकी योजना राबवा'
प्रशांत दामले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर
विरोधी गटाचे मताधिक्य रोखण्याचे सत्ताधारी गटाकडे मोठे आव्हान!
निवडणूक सह्याद्री साखर कारखान्याची पण पेरणी मात्र नगरपरिषद निवडणुकीची!
'मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे'
'वाचाळ मंत्र्याला वेळीच आवर घालणे आवश्यक'
आजपासून माथेरान पर्यटकांसाठी बेमुदत बंद