युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन 'आयपीएल'चे सामने स्थगित

धरमशाला येथून खेळाडूंना सुरक्षित हलविले

युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन 'आयपीएल'चे सामने स्थगित

नवी दिल्ली: प्रतिनिधी 

भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना क्रिकेट सुरू असणे योग्य नाही, या. विचाराने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल क्रिकेट स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे बीसीसीआयने नमूद केले आहे. 

पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये धर्मशाला येथे सुरू असलेला सामना सुरू असताना सुरक्षेच्या कारणास्तव ब्लॅक आऊट जाहीर केल्यामुळे अर्ध्यावर थांबवण्यात आला. त्यानंतर रेल्वेने खेळाडूंना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. 

तणावपूर्ण परिस्थितीत निर्माण झालेल्या वातावरणाबद्दल विशेषतः आयपीएल मध्ये खेळणाऱ्या विदेशी खेळाडूंनी चिंता व्यक्त केली. धर्मशाला येथील सामन्याच्या वेळी आलेल्या अनुभवाला लक्षात घेऊन आयपीएलचे आगामी सर्व सामने सगळी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी विदेशातून आलेल्या खेळाडूंना सुरक्षितपणे त्यांच्या ठिकाणी पोहचविण्याची व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाही  बीसीसीआयने दिली आहे. 

हे पण वाचा  'आता सर्जिकल स्ट्राइक नको तर थेट सर्जरीच हवी'

About The Author

Advertisement

Latest News

Advt