विरोधी गटाचे मताधिक्य रोखण्याचे सत्ताधारी गटाकडे मोठे आव्हान!
सह्याद्री कारखाना निवडणूक (वाठार किरोली गट - भाग 2)
शशिकांत क्षीरसागर, रहिमतपूर
सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत वाठार किरोली गटातून आमदार मनोज दादा घोरपडे गटाचे मताधिक्य रोखण्याची प्रतिष्ठापनाला सत्ताधारी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटाच्या विद्यमान व्हाईस चेअरमन लक्ष्मीताई गायकवाड यांची लागणार आहेत. वाठार किरोली गटात भाजपाचे माजी कृषी सभापती भीमराव पाटील व सत्ताधारी राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटाच्या लक्ष्मीताई गायकवाड व तारगावचे विद्यमान संचालक कांतीलाल पाटील अशा नेत्यांच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने कोणतीही निवडणूक वाठार तारगाव आर्वी अशा मोठ्या गावांना केंद्रबिंदू मानूनच त्यांच्याभोवती फिरत असते त्याला अपवाद सह्याद्री कारखाना सुद्धा ठरलेला नाही वाठार मध्ये 700 तारगाव परिसरात मध्ये एक हजार, सभासद मतदार आहेत कारखान्याची निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांना मानणारे आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या गटातून माजी उपसरपंच शंकरराव गायकवाड यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा चालू आहे
तर सत्ताधारी गटातून विद्यमान व्हाईस चेअरमन लक्ष्मीताई गायकवाड यांनाच पुन्हा संधी मिळेल असे बोलले जात आहे तसेच तसेच शेतकरी संघटनेचे मुरलीधर गायकवाड यांनी सुद्धा अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे दोन्ही गटांना त्यांची भूमिका कसे राहते यावर मताधिक्य अवलंबून राहणार आहे दुसरीकडे तारगाव परिसरातील दुर्गळवाडी नलवडेवाडी काळोशी रिकबदारवाडी मोहितेवाडी 1000 मतदान असल्याने व विद्यमान संचालक कांतीलाल पाटील हे परिसरातील मुरब्बी राजकारणी असल्यामुळे यांनाच बाळासाहेब पाटील उमेदवारी देतील अशी चर्चा चालू आहे त्यांना शह देण्यासाठी तारगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मोरे यांचा अर्ज आमदार घोरपडे गटातून दाखल केलेला आहे नुकतेच तर गावचे माजी पंचायत समिती सदस्य सुनील मलवडकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आमदार मनोज घोरपडे यांचे उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे निवडणुकीत फायदा होऊ शकतो असे बोलले जात आहे तसेच आमदार बाळासाहेब पाटील यांचे निष्ठावान माजी संचालक विठ्ठलराव घोरपडे यांचे पुतणे अभिजीत घोरपडे व त्यांचे कार्यकर्ते इतर कोणत्याही निवडणुकीला बरोबर नसले तरी गेली पंचवीस वर्षे कारखाना निवडणुकीला नेहमीच माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना साथ देत आले आहेत यावेळी मात्र आमदार घोरपडे गटाचा जाहीरपणे प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे
मात्र कोणत्या नाराजीमुळे हे घडले आहे याची चर्चा मात्र परिसरात सुरू आहे यावर विद्यमान संचालक कांतीलाल पाटील कोणती राजकीय रणनीती खेळतात यावर पुढील गणिते अवलंबून राहतील तसेच खासदार नितीन पाटील यांना सुद्धा मानणारा गट आहे त्यांची भूमिका सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे सातारा तालुक्यातील कोपर्डे येथील वसंतराव कदम यांनी अर्ज दाखल केला आहे मागील तीन पंचवार्षिक त्यांनी माघार घेतली होती त्यामुळे बाळासाहेब पाटील त्यांना उमेदवारी देतात का याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे सुद्धा लक्ष आहे अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख 21 मार्च असल्यामुळे या दिवशी खरे चित्र स्पष्ट होईल भविष्यात सत्ता कोणाची येऊ परंतु सभासदांच्या हितांचे निर्णय व्हावेत ही अपेक्षा सभासद वर्गातून व्यक्त केली जात आहे.
000
Comment List