'... तर रशिया युक्रेन युद्ध झालेच नसते'

पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांचा दावा

'... तर रशिया युक्रेन युद्ध झालेच नसते'

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था 

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये ज्यावेळी युद्धाचे ढग जमा होऊ लागले त्या काळात आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असतो तर हे युद्ध सुरू झाले नसते, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता करार पार पडण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली जात असून युक्रेनचे ऊर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर 30 दिवस हल्ले न करण्यास पुतीन यांनी मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ट्रम्प यांची अमेरिकन वेळेप्रमाणे मंगळवारी संध्याकाळी साडेसात ते रात्री साडेदहा अशी तब्बल तीन तास दूरध्वनीवर चर्चा झाली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक आणि शांततेच्या दिशेने पुढे पाऊल टाकणारी ठरली, असे ट्रम्प यांच्यावतीने सांगण्यात आले. 

रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये दीर्घकाळ सुरू असलेल्या युद्धात हजारो सैनिकांचे प्राण जात आहेत. युक्रेनचे अध्यक्ष व्लादोमीर झेलेनस्की यांच्याप्रमाणेच पुतीन देखील या युद्धाचा शेवट व्हावा, अशीच इच्छा व्यक्त करीत आहेत. विशिष्ट ठिकाणी तीस दिवसांच्या युद्धबंदीला पुतीन यांनी मान्यता देणे ही बाब सकारात्मक असून लवकरच आम्ही दोन्ही देशांमध्ये संपूर्ण शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. 

हे पण वाचा  'चीनपासून भारताला सतर्क राहण्याची गरज'

ट्रम्प आणि पुतीन यांच्यात झालेली चर्चा आणि एकूणच रशिया आणि युक्रेन शांतता करार यामुळे महाविनाशकारी युद्धाचा अंत तर होईलच शिवाय ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील सुसंवादात वाढ होऊन त्याचा फायदा अमेरिका आणि रशिया या दोन देशांनाही होऊ शकतो, याकडेही व्हाईट हाऊसने लक्ष वेधले आहे.

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

पाकिस्तानात हाहा:कार, कराची बेचिराख पाकिस्तानात हाहा:कार, कराची बेचिराख
नवी दिल्ली: प्रतिनिधी  काल संध्याकाळी भारताच्या विविध लष्करी तळांवर हल्ले करून पाकिस्तानने काढलेल्या कुरपतीचे अपेक्षेपेक्षा अधिक वाईट फळ पाकिस्तानला भोगावे...
इस्लामाबादसह पाकिस्तानच्या सात शहरांवर ड्रोन हल्ले
पाकिस्तानचा जम्मू विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला
सुदर्शनचक्राने केले पाक हवाई हल्ल्यापासून भारताचे संरक्षण
लाहोरपाठोपाठ कराचीतही भर दिवसा धमाका
शुभमन गिलच्या गळ्यात पडणार कसोटी कर्णधार पदाची माला
‘सोमेश्वर फाउंडेशन’तर्फे 'पुणे आयडॉल’ स्पर्धा १९ मेपासून 

Advt