'... तेव्हा झाला नाही का बाळासाहेबांचा अपमान?'

जया बच्चन यांनी केले कामराचे समर्थन

'... तेव्हा झाला नाही का बाळासाहेबांचा अपमान?'

मुंबई: प्रतिनिधी 

तुम्ही तुमचा मूळचा पक्ष सोडून सत्तेत असलेल्या पक्षासोबत गेलात त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान झाला नाही का, असा सवाल करीत विख्यात अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांनी कॉमेडियन कुणाल कामरा याचे समर्थन केले आहे.

कुणाल कामरा याने तयार केलेल्या एका व्यंगात्मक गाण्यावरून सध्या राज्यात मोठा वाद उफाळून आला आहे. या गाण्यात शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करण्यात आल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कुणच्या स्टुडिओची तोडफोड केली आहे. 

अशा आवाज दडपण्याच्या प्रकारांविरोधात माध्यमांनी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. बोलण्यावर बंदी घालण्यात आली तर माध्यमांचे काय होणार? आधीच माध्यमांची परिस्थिती वाईट आहे. माध्यमांवर अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात येत आहेत. उद्या, ही बातमी घ्या, ती घेऊ नका, असे सांगायला लागतील, असे जया बच्चन प्रसार माध्यमांना उद्देशून म्हणाल्या. 

हे पण वाचा  आमदार सुनील शेळके यांचे विधानसभेत घणाघाती भाषण, विविध मागण्यांसाठी सरकारला निर्वाणीचा इशारा

अभिव्यक्ती स्वातंत्र्य अस्तित्वात आहे कुठे, असा सवाल करून जया बच्चन म्हणाल्या की, फक्त सत्ताधाऱ्यांनाच कोणतीही कारवाई करण्याचे स्वातंत्र्य आहे. कुठे काही खटकले की विरोधकांना मारहाण करा. महिलांवर अत्याचार करा. त्यांना वाईट वागणूक द्या. त्यांची हत्या करा. 

 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

अमेरिकेच्या हुतींवरील हल्ल्याची संपूर्ण योजना उघड अमेरिकेच्या हुतींवरील हल्ल्याची संपूर्ण योजना उघड
वॉशिंग्टन: वृत्तसंस्था  अमेरिकेने हुती बंडखोरांवर निर्णायक हल्ले चढविण्यासाठी आखलेली योजना थेट एका पत्रकारापर्यंत पोहोचली. त्याने त्यावर लेख लिहून प्रत्यक्ष योजनेसह...
'मंगळवार पेठेतील जागा आंबेडकर स्मारकासाठीच'
Prashant Koratkar Arrested | प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक!
अखेर प्रशांत कोरटकर जेरबंद
'ट्रोलिंग हा सिनेसृष्टीतील नवा धंदा'
'... तेव्हा झाला नाही का बाळासाहेबांचा अपमान?'
गुढीपाडव्या निमित्त चंदुकाका सराफ ज्वेल्स यांच्या धमाकेदार ऑफर्स!

Advt