गुढीपाडव्या निमित्त चंदुकाका सराफ ज्वेल्स यांच्या धमाकेदार ऑफर्स!
चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा महत्वाचा सण. गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त. गुढीपाडव्याच्या औचीत्यावर सोने खरेदीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपल्या वैभवात भर पाडण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त सोने खरेदीला अत्यंत शुभ मानला जातो. याच सुवर्ण खरेदीच्या परंपरेला पुढे चालवण्यासाठी गेल्या 198 वर्षापासून शुद्धतेचा वारसा जपणारे चंदुकाका सराफ ज्वेल्स आपल्यासाठी यंदाही आकर्षक अशा ऑफर्स घेऊन आले आहे.
१८२७ पासून आपल्या शुद्ध सोने-चांदी आणि हिऱ्याच्या दागिन्यांनी आपल्या ग्राहकांना भुरळ पाडणारे चंदुकाका सराफ ज्वेल्स यंदाही गुढीपाडव्यानिमित्त आकर्षक अशा ऑफर आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत .यंदाच्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून ‘धमाकेदार डायमंड ऑफर’ आणि ‘सोन्यावर सोनं फ्री’ ऑफर मुळे ग्राहकांना भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही.
गुढीपाडव्याचे निमित्त साधून हिऱ्याच्या ऑफरमध्ये ग्राहकांना मोठा लाभ मिळणार आहे. डायमंड ऑफरमध्ये हिऱ्यांच्या कोणत्याही नेकलेस आणि बांगड्यांवर शून्य टक्के (0 %) मेकिंग चार्जेस आकारण्यात येणार आहेत. ही ऑफर चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या सर्व शाखांमध्ये सुरू राहणार आहे.
गुढीपाडव्या निमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट १५ % सूट देण्यात येणार आहे. ही ऑफर २७ ते ३० मार्च पर्यंत सुरू राहणार असून चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या पुण्यातील सर्व शाखांसह सांगली, कराड, सातारा आणि कोल्हापूर या शाखांमध्येही ही ऑफर असणार आहे.
चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या या गुढीपाडव्याच्या ऑफर्स ग्राहकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. सर्व प्रकारच्या सोने आणि हिऱ्याच्या दागिन्यांच्या विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईन या ग्राहकांना नक्कीच आवडतील. विशेष म्हणजे हिऱ्याच्या दागिन्यांमध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेल्या आकर्षक आणि विविधतापूर्ण डिझाईन गुढीपाडव्याच्या निमित्ताने तयार करण्यात आल्या आहेत.
तरी सर्व ग्राहकांनी चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्ताचे औचित्य साधून या आकर्षक आणि फायदेशीर अशा ऑफर्सचा नक्की फायदा घ्यावा, असे आवाहन चंदुकाका सराफ ज्वेल्स चे संचालक सिद्धार्थ शहा संचालक यांनी केले आहे.
000