अखेर प्रशांत कोरटकर जेरबंद
कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून घेतले ताब्यात
कोल्हापूर: प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करणारा आणि इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी तेलंगणा येथून अटक केली आहे.
इंद्रजीत सावंत यांच्या तक्रारीवरून कोरडकर वर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो फरार झाला होता. त्याचे दुबईमधील चित्रण समाज माध्यमातून प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे तो प्रदेशात पळून गेल्याची चर्चा सुरू होती. मात्र, सावंत यांच्या वकिलांनी केलेल्या मागणीनुसार पोलिसांनी कोरटकर याचे पारपत्र (पासपोर्ट) जप्त केले. कोरटकर यांच्या पत्नीने त्याचे पारपत्र पोलिसांकडे आणून दिले. त्यावरून तो परदेशी गेला नसल्याचे स्पष्ट झाले.
कोरडकर याच्या वतीने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी करण्यात आलेला अर्ज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर कोरडकर च्य वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेचा निकाल लागेपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी विनंती ही कोरटकरच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला केली होती. मात्र, न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला आहे.