'सभागृहात आपल्याला बोलू दिले जात नाही'

लोकसभा अध्यक्षांनी फटकारल्यानंतर राहुल गांधी यांचा दावा

'सभागृहात आपल्याला बोलू दिले जात नाही'

नवी दिल्ली: प्रतिनिधी 

सभागृहात नेमके काय सुरू आहे तेच समजत नाही. सभागृहात मला बोलू दिले जात नाही. लोकसभा अध्यक्षांनी माझ्याबद्दल काहीतरी अनावश्यक टिप्पणी केली आणि त्यानंतर काहीच कारण नसताना सभागृहाच्या कामकाजाला स्थगिती दिली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना संसदेच्या प्रथा आणि परंपरा याचे पालन करण्याची तंबी दिली. आपल्याकडून सभागृहाच्या मर्यादा आणि शालिनीता याच्या उच्च मानदंडांचे पालन व्हावे अशी अपेक्षा आहे. काही अशा घटना माझ्या निदर्शनास आल्या आहेत की संसद सदस्यांकडून सभागृहाचे नियम आणि परंपरा यानुसार वर्तणूक केली जात नाही. या सभागृहात वडील मुलगी, आई मुलगा, पती-पत्नी असे अनेक सदस्य आहेत. किमान लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांकडून तरी नियम 349 अनुसार वर्तन केले जावे, अशी अपेक्षा आहे, असे बिर्ला म्हणाले. मात्र, या विधानाचे नक्की कारण समजू शकले नाही. काँग्रेस सदस्यांनी त्यांच्या या विधानाला आक्षेप घेतला. यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.

त्यानंतर संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकशाहीत विरोधी पक्षाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. लोकशाहीतील ती एक परंपरा देखील आहे. मात्र, तिचे पालन केले जात नाही. मी जेव्हा बोलायला उठतो तेव्हा मला थोपवले जाते. बोलू दिले जात नाही. 

हे पण वाचा  ईदची नको, हवी न्यायाची भेट!

महाकुंभ ही भारताची मोठी परंपरा आहे. सांस्कृतिक उत्सव आहे. इतिहासाचा महत्वाचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर बोलले. मलाही त्याबद्दल बोलायचे होते. त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे बेरोजगारी. लाखो युवक बेरोजगारीचा सामना करीत आहेत. त्यांना काम हवे आहे. रोजगार हवा आहे. याबद्दलही पंतप्रधानांनी बोलायला हवे, अशी अपेक्षा होती. मात्र, ते बोलले नाहीत. मला या संस्थेबद्दल बोलायचे होते पण बोलू दिले नाही, अशी खंत गांधी यांनी व्यक्त केली. लोकशाहीत विरोधकांनाही काही स्थान असते. मात्र, इथे आम्हाला बोलूच दिले जात नाही, असे गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

ईदची नको, हवी न्यायाची भेट! ईदची नको, हवी न्यायाची भेट!
स्थित्यंतर / राही भिडे हिंदू, इस्लामसह अन्य धर्मातही असे मानले जाते की इतरांना, विशेषतः दुर्बलांना मदत केल्याने पुण्य मिळते. त्यामुळे...
नाट्य परिषद कोथरूड शाखेने उभारली सांस्कृतिक कलावंत गुढी
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नव्या संचातील 'तुझे आहे तुजपाशी'चा  रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर
लष्करी अधिकाऱ्याकडून लष्करी अधिकाऱ्याचीच फसवणूक
ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख शिंदे गटात डेरेदाखल
खंडणी आणि खुनाबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा महत्त्वाचा जबाब
महाराष्ट्र बँक सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण

Advt