Crime News | १ लाखाची लाच स्वीकारताना बारामतीचे नगररचनाकार ढेकळे अटकेत!

Crime News | १ लाखाची लाच स्वीकारताना बारामतीचे नगररचनाकार ढेकळे अटकेत!

बारामती (वा.) : शहरातील बांधकाम व्यवसायाकडून गृह प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी करून त्यातील एक लाख रुपये रकमेची लाच स्वीकारताना बारामती नगर परिषदेचे नगररचनाकार विकास किसनराव ढेकळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली. 
 

या कारवाईमुळे बारामती शहरात खळबळ उडाली आहे. बारामती शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील रुई याठिकाणी निर्मिती विहार इमारत बी विंग १ , या गृह प्रकल्पाचा प्रस्ताव बारामती नगर परिषदेच्या नगररचना विभागाकडे मंजुरीसाठी दाखल केलेला आहे. सदर प्रस्ताव मंजुरीसाठी नगररचनाकार विकास ढेकळे यांनी तक्रारदारांना दोन लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार १९ मार्च २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने केली. दरम्यान तडजोडी अंती १ लाख ७५ हजार रुपयांची मागणी नगर रचनाकार ढेकळे यांनी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर या विभागाने तक्रारीची पडताळणी केली, त्यानुसार तक्रारदाराने १ लाख ७५ हजार रुपये रकमेपैकी १ लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले. सदर रक्कम ढेकळे यांनी बारामती शहरातील ऑक्सिजन जिम या ठिकाणी दि १९ मार्च रोजी देण्यासाठी तक्रारदाराला बोलावले.

यादरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल भोसले, पोलीस हवालदार किरण चिमटे, महिला पोलिस शिपाई कोमल शेटे, चालक पोलिस शिपाई दीपक दिवेकर आदींच्या पथकाने सापळा लावला. दि १९ रोजी रात्री आठ वाजता बारामती शहरातील ऑक्सिजन जिम याठिकाणी १ लाख रुपयांची लाच नगररचनाकार ढेकळे यांनी तक्रारदार  बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून स्वीकारली , याच वेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून ढेकळे यांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातील १ लाख रुपये व मोबाईल जप्त केला. बारामती शहर पोलिस ठाण्यात आरोपी विकास ढेकळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

000

हे पण वाचा  पीएचडी मार्गदर्शकांचे गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा

About The Author

Advertisement

Latest News

पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही - अशोक सराफ पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही - अशोक सराफ
पुणे :  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण अशा थोर व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार मिळाला, हे माझे  भाग्यच आहे. पुणेकरांनी आजपर्यंत...
समाजाचा ढळलेला तोल सावरण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे स्मरण आवश्यक!
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का? : हर्षवर्धन सपकाळ
औंध रुग्णालयाच्या आवारात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे
Blockchain | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बी. एस्सी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात!
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची समता सर्वस्पर्शी व सर्वव्यापी : ॲड.क्षितीज गायकवाड    
OLA Electric | ओला इलेक्ट्रिककडून फेब्रुवारीतील तात्पुरत्या नोंदणी बॅकलॉगवर स्पष्टीकरण!

Advt