नाट्य परिषद कोथरूड शाखेने उभारली सांस्कृतिक कलावंत गुढी

वंदना गुप्ते व संकर्षण कऱ्हाडे यांच्या हस्ते गुढीचे पूजन

नाट्य परिषद कोथरूड शाखेने उभारली सांस्कृतिक कलावंत गुढी

पुणे : प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे आज (दि. 20) मराठी नववर्षारंभ (गुढी पाडवा) आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून सांस्कृतिक कलावंत गुढी उभारण्यात आली. साहित्यिक, कलावंत आणि रसिकांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‌‘कुटंब कीर्तन‌’ या नाटकातील कलाकार सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते आणि सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांच्या हस्ते गुढी पूजन करण्यात आले. माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, सुगंधा शिरवळकर, बालसाहित्यिक राजीव तांबे, नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, महापालिकेच्या नाट्यगृहांचे प्रमुख व्यवस्थापक राजेश कामठे, नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष समीर हंपी, प्रमुख कार्यवाह सत्यजित धांडेकर, कोषाध्यक्ष दीपक गुप्ते, सांस्कृतिक विभाग प्रमुख अनुराधा हटकर, अश्विनी थोरात, अभिजित आपटे, धनंजय पूरकर, प्रसिद्ध गायिका मनिषा निश्चल, मकरंद टिल्लू आदी उपस्थित होते.

स्वागतपर प्रास्ताविकात सुनील महाजन म्हणाले, गेल्या 22 वर्षांपासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कलावंत गुढी उभारण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

हे पण वाचा  'व्यापाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करा'

सत्यजित धांडेकर यांनी कोथरूड शोखेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या सांस्कृतिक उपक्रमांची माहिती सांगितली.

सांस्कृतिक गुढी उपक्रमाचे कौतुक करून वंदना गुप्ते म्हणाल्या, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची वास्तू खूप छान आणि प्रसन्न असून रसिकांच्या अलोट गर्दीने कायम फुललेली असते. अभिनयाच्या माध्यमातून 50 वर्षांपूर्वी रसिकांसाठी गुढी उभारली असून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 1125 वा प्रयोग करीत असल्याचा आनंद आहे. नाट्यगृहाचा नावलौकिक कायम वाढत रहावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

संकर्षण कऱ्हाडे म्हणाले, नाट्यगृहाचे पाठबळ आणि रसिक प्रेक्षकांच्या साथीने भविष्यकाळात सांस्कृतिक क्षेत्रात उंचच उंच गुढी उभारू. 
नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेच्या माध्यमातून बालनाट्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत या बद्दल राजीव तांबे यांनी पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. पृथ्वीराज सुतार यांनी नववर्षानिमित्त कलाकार आणि रसिकांना शुभेच्छा देऊन भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यजित धांडेकर यांनी केले तर आभार समीर हंपी यांनी मानले.

 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

वेदांत ओडिशाला जागतिक पॉवरहाऊसमध्ये रूपांतरित करत आहे! वेदांत ओडिशाला जागतिक पॉवरहाऊसमध्ये रूपांतरित करत आहे!
भुवनेश्वर (ओडिशा) [भारत] : ओडिशा हे अनेक विजयांनी भरलेले राज्य आहे. त्याच्या खनिजांनी समृद्ध साठ्यांनी राज्याला भारतातील एक प्रमुख उत्पादन...
'व्यापाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करा'
'तुम्ही तर पुढच्या पंचवीस वर्षासाठी पक्षाचे अध्यक्ष'
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी बदलले खंडपीठ
नवी विकासकामे नकोत, तिजोरीत खडखडाट!
काँग्रेसची नवी रणनीती; कोल्हापूरच्या या नेत्यावर पुण्याची जबाबदारी! काँग्रेस प्रदेशाध्यांनी केले मोठे फेरबदल!
'आठ दिवसात संपूर्ण कारभार मराठीतून चालवा'

Advt