काँग्रेसची नवी रणनीती; कोल्हापूरच्या या नेत्यावर पुण्याची जबाबदारी! काँग्रेस प्रदेशाध्यांनी केले मोठे फेरबदल!
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. मात्र विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यानंतर काँग्रसे पक्षात अनेक बदल करण्यात आले. महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नावं चर्चेत होती. पण पक्षाने सपकाळ यांना संधी दिली. चर्चेत असलेल्या नावात सतेज उर्फ बंटी पाटील यांचे देखील नाव होते. पण त्यांची संधी हुकली. आता सतेज पाटील यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. या निरीक्षकांवर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानुसार सपकाळ यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी पक्षातील एका जेष्ठ नेत्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता नियुक्त करण्यात आलेल्या निरीक्षकांनी जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी पुणे जिल्ह्याच्या दौरा केला. त्यावेळी त्यांनी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शहरातील पक्षाचा स्थितीची आढवा घेतला. अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी सतेज पाटील यांच्याकडे सोपण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील संघटना बळकटीकरणावर भर दिला जाणार आहे.
000