... तर लाडक्या बहिणींना मिळणार वाढीव निधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महत्त्वपूर्ण विधान

... तर लाडक्या बहिणींना मिळणार वाढीव निधी

बीड: प्रतिनिधी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. मात्र, राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर या महिलांना 2 हजार 100 रुपयांचा निधी देण्याबाबत विचार करण्यात येईल, असे महत्त्वपूर्ण विधान राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सादर केली. मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड विजय मिळवून देण्यात लाडक्या बहिणीचा मोठा वाटा होता. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेवर आल्यास या योजनेतील रक्कम दीड हजार रुपयांवरून 2 हजार 100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र, अद्याप त्याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाही. 

वास्तविक लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत असल्याचे म्हटले जाते. राज्य सरकार विकास कामांचा निधी या योजनेकडे वळवत असल्यामुळे विकास कामांवर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. काही वेळा तर राज्य सरकारकडून ही योजना गुंडाळली जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते. मात्र, विविध मंत्री आणि महायुतीच्या नेत्यांकडून ही योजना बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही देण्यात येत आहे. 

हे पण वाचा  गर्जा महाराष्ट्र माझा...

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

'प्रसंगी जीव देऊ पण वक्फ कायद्यातील सुधारणा... ' 'प्रसंगी जीव देऊ पण वक्फ कायद्यातील सुधारणा... '
नवी दिल्ली: प्रतिनिधी आपण प्रसंगी जीव देखील देऊ पण वक्फ कायद्यातील सुधारणा मान्य करणार नाही, असा इशारा सुधारणांना विरोध करणाऱ्या...
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाने देशभक्तीची ज्योत मनामनात प्रज्वलीत करणारे अभिनेते हरपले
'सजना'चे  मोहक पोस्टर आणि टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
'मनसैनिकांवर कायदेशीर कारवाई करा'
भक्तिभावपूर्ण स्वरातील 'पांडुरंग' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे हृदयविकाराने निधन
वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेतही संमत

Advt