'सजना'चे  मोहक पोस्टर आणि टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांचा रोमँटिक चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर

'सजना'चे  मोहक पोस्टर आणि टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: प्रतिनिधी

सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रें, ज्यांच्या मोहक आणि जिवंत वाटणा-या चित्रांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामान्य लोकांपासून, प्रतिष्ठीत आणि ख्यातनाम लोकांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. त्यांचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं आहे. शशिकांत धोत्रेंचा पहिलाच रोमँटिक सिनेमा 'सजना' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सजना' चित्रपटाचं अतिशय आकर्षक आणि धोत्रेंच्या चित्रांसारखंच मोहक आणि मंत्रमुग्ध करणारं पोस्टर आणि टिझर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

चित्रपटसृष्टीला नेहमीच विविध रोमॅंटीक कथांनी भुरळ पाडली आहे विशेषतः तरूण-तरुणींच्या हृदयावर अधिराज्य हे रोमॅंटीक कथांनीच गाजवलं आहे. सिनेसृष्टीच्या इतिहासात असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कथांसह प्रयोग केले आहेत. परंतु, प्रेमकथा नेहमीच चित्रपटांचा आत्मा राहिल्या आहेत. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना, संपूर्ण कुटुंबाला आकर्षित करणारा प्रकार म्हणून रोमॅंटीक सिनेमाकडे पाहिलं जातं. असाच रोमँटिक चित्रपट 'सजना' आपल्या भेटीला लवकरच येणार आहे. शशिकांत धोत्रे निर्मित आणि आणि दिग्दर्शित 'सजना' सिनेमा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.

'सजना' सिनेमाच्या पोस्टरवर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दोन प्रेमी आपण पाहू शकतो जे पाण्यात रोमँटिक पोज मधे आहेत. धोत्रेंच्या चित्रांसारखंच हे पोस्टरसुद्धा एक सुंदर पेंटिंगच आहे. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार शशिकांत धोत्रे यांचे जिवलग मित्र प्रमोद कुर्लेकर यांनी तयार केले आहे. त्यात दोन प्रेमी पाण्यांवर तरंगत आहेत. आजूबाजूच्या  संपूर्ण जगाचा जणू त्यांना विसर पडलाय. "सजना" सिनेमाच्या टिझरमध्येही ह्याच जोडप्याला आपण रोमँटिक संवाद साधताना पाहू शकतो.

हे पण वाचा  लष्करी अधिकाऱ्याकडून लष्करी अधिकाऱ्याचीच फसवणूक

विशेष म्हणजे टीझर मधील प्रत्येक शॉट लक्षवेधी असून पेंटींग प्रमाणेच बारकाईने चितारलेले वाटतात, तरुण फ्रेश जोडी या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे त्यांचा चेहरा टिझर मध्ये अद्याप पूर्णपणे उघड केला गेला नाही. टिझरमध्ये सुंदर पेंटीग सारख्या व्हीजुअल्स सोबतच कर्णमधूर असं ओंकारस्वरूपचं संगीत आणि सोनू निगमच्या आवाजात आहे जे नक्कीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल. ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित ही प्रेमकथा असून गावातील सुंदर दृश्य आणखी शोभा वाढवते. टिझरच्या शेवटी प्रेमापोटी एकमेकांमध्ये गुंतलेल्या जोडप्याला कोणते परिणाम भोगावे लागतात याबद्दलही छोटी झलक पहायला मिळते. त्यामुळे नक्की चित्रपटाची कथा काय असणार आहे, याची उत्सुकता द्विगुणित होते. टिझरमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 'सजना' सिनेमा २३ मे २०२५ ला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'सजना' चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनसुद्धा शशिकांत धोत्रे ह्यांनी केलं आहे. शशिकांत धोत्रे हे एक संवेदनशील चित्रकार म्हणून लोकप्रिय आहेतच आणि आता ते 'सजना'मधून चित्रपटनिर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. त्यांनी काढलेली चित्रं आज देश-विदेशात लाखोंच्या संख्येनं रसिकांची दाद मिळवतायत, अशाच प्रकारे त्यांचा हा पहिला मराठी सिनेमा सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा निर्मात्यांना विश्वास आहे.

https://youtu.be/kdIlmKHHbwg?si=F_6AJaKH1pxs6cwc

About The Author

Advertisement

Latest News

बदल ही एकमेव गोष्ट आहे जी स्थिर राहते डॉ. सी.जयकुमार यांचे विचार! बदल ही एकमेव गोष्ट आहे जी स्थिर राहते डॉ. सी.जयकुमार यांचे विचार!
पुणे : बांधकाम क्षेत्र भारताच्या आर्थिक विकासाचा एक महत्वाचा आधारस्तंभ म्हणून उदयास येत असून जीडीपी आणि रोजगारात महत्वपूर्ण योगदान देत...
मंगेशकर रुग्णालयाचा 'बैल गेला अन् झोपा केला'
'नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांची जागा ताब्यात घ्या'
'प्रसंगी जीव देऊ पण वक्फ कायद्यातील सुधारणा... '
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाने देशभक्तीची ज्योत मनामनात प्रज्वलीत करणारे अभिनेते हरपले
'सजना'चे  मोहक पोस्टर आणि टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
'मनसैनिकांवर कायदेशीर कारवाई करा'

Advt