डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त 12 ते 14 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रम
विकास प्रतिष्ठान, बावधन व आरपीआय आठवले गटाच्या वतीने आयोजन

पुणे: प्रतिनिधी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विकास प्रतिष्ठान, बावधन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने 12 ते 14 एप्रिल दरम्यान विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वराज कांबळे आणि आरपीआयचे युवक आघाडी प्रदेश संघटक उमेश कांबळे यांनी दिली आहे.
या उपक्रमांतर्गत शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता 'भीमस्पंदन' हा भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता 'न्यू होम मिनिस्टर' हा अभिनेता क्रांती नाना माळेगावकर यांचा महिलांसाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार असून विजेत्या स्पर्धकांना पैठणीबरोबरच स्कुटी, फ्रिज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, कूलर अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया रोड ते सिद्धार्थ नगर बावधन बुद्रुक यादरम्यान 14 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सर्वच कार्यक्रमांच्या आयोजनात माजी सरपंच वैशाली कांबळे, तुषार दगडे पाटील, निलेश दगडे पाटील, गोविंद निकाळजे, स्वप्निल दगडे पाटील, विजय दगडे पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
पाषाण, बावधन, कोथरूड परिसरातील महिलांनी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात उत्साहाने भाग घ्यावा तसेच या परिसरातील नागरिकांनी सर्वच कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
About The Author
Latest News
