डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला सर्वात मोठे वळण

सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, ओळखही पटली

Hi

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला सर्वात मोठे वळण

सोलापूर: प्रतिनिधी

प्रसिद्ध न्युरो फिजिशीयन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा  "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर" योजनेचा लाभ आयटीआयच्या विद्यार्थिनींनाही मिळावा!

कर्मचाऱ्याकडून धमकी मिळाल्याने तणावाखाली असल्याची चर्चा
डॉ. वळसंगकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदोपत्रांवरती हवे होते. त्यासाठी त्यांचा आग्रह देखील होता, पण आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती. यासंदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता. पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं. जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती, तिला डॉ. वळसंगकरांनी कामावरून देखील काढलं होतं. पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती. तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, डॉक्टरांना ते मान्य नव्हते. या प्रकरणामुळे देखील डॉक्टर तणावाखाली गेल्याचे आणि त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे.

About The Author

Advertisement

Latest News

पुणे-मुंबई महामार्गावर कार जळून खाक, वडगाव मावळ येथील घटना, पुणे-मुंबई महामार्गावर कार जळून खाक, वडगाव मावळ येथील घटना,
वडगाव मावळ प्रतिनिधी जुना मुंबई पुणे महामार्गावर वडगाव नगरपंचायत हद्दीत पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारने अचानक पेट घेतला.चालकाने प्रसंगावधान राखत कार...
स्वच्छतेचे महत्व ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
सुप्रसिद्ध-अभिनेते भरत जाधव यांना ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आवाज
मराठी पत्रकार संघाच्या शहराध्यक्षपदी नंदकुमार सातुर्डेकर
वडूथयेथील पुलाचा 180 वा वाढदिवस साजरा
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन!

Advt