'२६/११ खटल्या संदर्भात तथ्यहीन विधाने करू नका'
काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचा इशारा
पुणे -प्रतिनिधी
२६/११ खटल्याचे वास्तव तत्कालीन सरकारी वकील व भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे ऊमेदवार अँड उज्वल निकम यांचे कडुन माधव भांडारी यांनी समजून ध्यावे व मगच उथळ व हास्यास्पद आरोप करावेत, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला. भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी २६/११ च्या हल्ल्यात काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. या आरोपाचे तिवारी यांनी खंडन केले.
ते पुढे म्हणाले की, २६/११ अतिरेकी हल्ला तेंव्हाच्या काँग्रेस शासन काळात सक्षम पोलीस अघिकाऱ्यांनी जीवाची जोखीम घेऊन प्रसंगी बलिदान देऊन अजमल कसाब यास पकडले व त्यास एनकाऊंटर करून नव्हे तर रितसर न्यायिक प्रक्रिया पार पाडून फाशीवर चढवले. अजमल कसाब असो वा अफजल गुरू या अतिरेक्यांना मृत्युदंडाची शिक्षा देणारे काँग्रेस सरकारच होते.
मात्र, भाजप सरकारच्या काळात, कंदहार येथे अतिरेक्यांना सोडण्याचे काम वा संसदेवर गोळीबाराची नामुष्की, काश्मिरात पंडीतांची हत्या, पुलवामा मधील ४० सीआरपीएफ जवानांची हत्या, चीनकडून घुसखोरी व २० भारतीय जवानांची हत्या हे सर्व देशास नामुष्की आणणारे प्रकार व हल्ले’ झाले याचे खरेतर भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी आकलन करावे. बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारी व तथ्यहीन वक्तव्ये करून ऊठसूठ काँग्रेसवर बेछूट आरोप पुन्हा करू नयेत असेही तिवारी यांनी सुनावले.