पाकिस्तानात पसरले भीतीचे वातावरण
चीन आणि तुर्कीने दिली शस्त्रास्त्रांची मदत
इस्लामाबाद: वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला कोणत्या मार्गाने धडा शिकवणार, या भीतीने पाकिस्तानचा थरकाप झाला आहे. भारत आणि युद्ध पुकारल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी कंगाल पाकिस्तानने वेगवेगळ्या देशांसमोर झोल्या पसरायला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात एकाकी पडलेल्या पाकिस्तानला फारसा पाठिंबा मिळत नसला तरी देखील चीन आणि तुर्की या देशांनी त्यांना शस्त्रांचा पुरवठा केला आहे. मात्र, लढाऊ वाहनांमध्ये भरण्यासाठी इंधन देखील नसलेल्या पाकिस्तानला भारतासमोर तीन दिवस तरी टिकाव धरता येईल की नाही, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
भारताच्या संभाव्य कारवाईमुळे खुद्द पाक सैन्यात धास्ती निर्माण झाली आहे. पाक सैन्याधिकारी कितीही बढाया मारत असेल तरी त्यांना वस्तुस्थितीची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे अनेक पाकिस्तानी सैन्याधिकाऱ्यांनी. राजीनामे दिले आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी आपले कुटुंब विदेशात हलवले आहे. भारताच्या विरोधात गरळ ओकणारे पाक लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर मूग गिळून बंकरमध्ये रवाना झाल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती कमालीची बिकट आहे. युद्ध झाले तर रणागड्यात भरण्यासाठी त्यांच्याकडे डिझेल नाही. ते विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या उरल्या सुरल्या मित्र देशांकडे हात पसरायला सुरुवात केली आहे. चीनने पाकिस्तानला जमिनीवरून हवेत २०० किलो मीटर अंतरावर मारा करणारी १०० पी एल ५ क्षेपणास्त्र दिली आहेत. तुर्कीमधून ६ सी १३० हरक्युलस विमाने युद्धसामग्री घेऊन पाकिस्तानात उतरली आहेत.
अन्य कोणतेही देश पाकिस्तानला पाठीशी घालण्यास तयार नाहीत. जगातील सर्व बड्या राष्ट्रांनी भारताला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. अधिकृत रित्या माहिती दिली जात नसली तरी भारताच्या विमानवाहू युद्धनौका कराचीकडे तोंड करून उभ्या ठाकल्या आहेत. पाणबुड्या देखील आवश्यक ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. इस्राएल भारताच्या खांद्याला खांदा लावून पाकिस्तानशी लढण्यास तयार आहे. त्यामुळे भारत आणि इस्राएलची पाकिस्तान विरोधात संयुक्त मोहीम देखील उघडली जाऊ शकते.
स्वतःचे घर. सांभाळू शकत नसलेल्या पाकिस्तानने भारताची कुरापत काढून आपला विनाश ओढवून घेतला आहे. बलोच लिबरेशन आर्मी आणि तहरिक ए तालिबान पाकिस्तानसारख्या संघटाबंसमोर नांगी टाकणारे पाक सैन्य भारताशी मुकाबला कसा करणार, हाच सवाल केला जात आहे. तरी देखील पाकिस्तानची खुमखुमी कमी झालेली दिसून येत नाही. पाक सैन्य सीमेवर वारंवार युद्धबंदीचा भंग करीत आहे. त्यामुळे राजौरी पूंछ या भागात पाकिस्तानी सैन्य गोळीबार करत असून भारतीय सैनिक त्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत.