बाळासाहेब थोरात यांचा पक्षनेते पदाचा राजीनामा
अखेर काँग्रेसमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर
On
प्रदेश काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेली खदखद आणि दुफळी आता चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
मुंबई: प्रतिनिधी
प्रदेश काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेली खदखद आणि दुफळी आता चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वारे वाहू लागले होते. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात त झालेल्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यावरून या नाराजीला तोंड फुटले. पक्षाने तिकीट नाकारल्यावर तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय प्राप्त केला.
निवडणूक पार पडतात तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले आणि प्रदेश पातळीवरील नेतृत्वावर गंभीर आरोप केले. आपल्या कुटुंबाला पक्षातून हद्दपार करण्यासाठी आणि आपले मामा बाळासाहेब थोरात यांच्यावर शिंतोडे उडवण्यासाठी पटोले यांनी नियोजनबद्ध कारस्थाने केल्याचा आरोप त्यांनी केला.
खुद्द थोरात यांनी पटोले यांच्या विरोधात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे लेखी तक्रार नुकतीच दिली आहे. पक्षातील कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना पाठवले आपल्याला विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे यापुढील काळात पटोले यांच्याबरोबर काम करणे अशक्य आहे, असे थोरात यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.
या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी बाळासाहेब थोरात यांच्यावर कारवाई करणार की प्रदेशाध्यक्ष पटोले यांना समज देणार हे गुलदस्त्यात असताना आता थोरात यांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
Comment List