बारसू प्रकल्पावरून होणार का आघाडीत बिघाडी?

पवार यांच्या सल्ल्याबाबत राऊत यांनी व्यक्त केली मतभिन्नता

बारसू प्रकल्पावरून होणार का आघाडीत बिघाडी?

स्थानिकांची जी भूमिका तीच आमची भूमिका, असा पवित्र घेऊन ठाकरे गटाने बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध व्यक्त केला आहे. स्थानिक जनतेला विश्वासात घ्या, या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सल्ल्याबाबत ठाकरे घटाने मतभेद व्यक्त केले आहे. 

मुंबई: प्रतिनिधी 

स्थानिकांची जी भूमिका तीच आमची भूमिका, असा पवित्र घेऊन ठाकरे गटाने बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध व्यक्त केला आहे. स्थानिक जनतेला विश्वासात घ्या, या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सल्ल्याबाबत ठाकरे घटाने मतभेद व्यक्त केले आहे. 

बारसू प्रकल्पासाठी स्थानिकांना विश्वासात घ्या. त्यांच्यावर जबरदस्ती करू नका. पोलिसी बाळाचा वापर करू नका, असा सल्ला पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत दिला आहे. मात्र, ही सबुरीदेखील ठाकरे गटाला मान्य नाही. 

कोकणातील स्थानिक नागरिकांचा शिंदे फडणवीस सरकारवर विश्वासच नाही. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा आणि विश्वासात घेण्याचा प्रश्नच येत नाही. स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया थांबवणे हाच आता एकमेव मार्ग आहे, असे राऊत यांनी सांगितले. 

हे पण वाचा  'मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे'

या प्रकल्पाची जागा महाविकास आघाडी सरकारच्या काळातच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केंद्राला प्रस्तावित केली होती. मात्र ही जागा ताब्यात घेण्यासाठी तत्कालीन सरकारने स्थानिकांवर कोणतीही जोर जबरदस्ती केली नाही. केंद्राने पर्यायी जागा तुचविण्यास सांगितल्यानंतर त्याप्रमाणे पर्यायी जागाही त्यांना सुचविण्यात आली आहे, असे राऊत म्हणाले. 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

नागपूर दंगल सरकारपुरस्कृत आहे म्हणावे का?
BARTI news | वेबसाईट द्वारे महाडचा सत्याग्रह आता मराठीसह कन्नड भाषेतही!
'ऊसतोडणी कामगारांसाठी एक खिडकी योजना राबवा'
प्रशांत दामले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर
विरोधी गटाचे मताधिक्य रोखण्याचे सत्ताधारी गटाकडे मोठे आव्हान!
निवडणूक सह्याद्री साखर कारखान्याची पण पेरणी मात्र नगरपरिषद निवडणुकीची!
'मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे'
'वाचाळ मंत्र्याला वेळीच आवर घालणे आवश्यक'
आजपासून माथेरान पर्यटकांसाठी बेमुदत बंद
पीएचडी मार्गदर्शकांचे गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा