BARTI news | वेबसाईट द्वारे महाडचा सत्याग्रह आता मराठीसह कन्नड भाषेतही!

बार्टी संस्थेने घेतला पुढाकार; 20 मार्च 2025 रोजी सामाजिक न्याय मंत्री शिरसाट व डॉ भाग्यलक्ष्मी यांचे हस्ते लोकार्पण

BARTI news | वेबसाईट द्वारे महाडचा सत्याग्रह आता मराठीसह कन्नड भाषेतही!

महाड : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी खुले व्हावे याकरिता सत्याग्रह केला आणि हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे असा आदर्श ठेवला. या संपूर्ण सत्याग्रहाचे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे विद्यार्थ्यांसाठी नागरिकांकरिता सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणाऱ्या वेबसाईटचे इंग्रजी, मराठी तसेच कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम या भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून देणाऱ्या वेबसाईटचे लोकार्पण बार्टीमार्फत सामाजिक न्याय विभागाचे मंत्री श्री संजय शिरसाट व कर्नाटक राज्यात कार्यान्वित असणाऱ्या आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालिका  डॉ. भाग्यलक्ष्मी यांचे हस्ते 20 मार्च 2025 रोजी होणार असल्याचे बार्टी संस्थेचे महासंचालक श्री सुनील वारे यांनी सांगितले.

ही वेबसाईट महाडचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व दर्शवते.
हा कार्यक्रम महाडच्या स्थानिक प्रशासन आणि नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. वेबसाईटवर महाडचा इतिहास, पर्यटन स्थळे आणि स्थानिक सेवांची माहिती असेल. या वेबसाईटचा उद्देश पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना महाडची संपूर्ण माहिती देणे हा आहे. महाडच्या लढ्याला २०२७ या वर्षात शंभर वर्षे झालेली असतील. आजच्या डिजिटल युगात हे संकेतस्थळ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 
संकेतस्थळाची वैशिष्ट्ये:
 • नागरिकांना सर्व शासकीय सेवांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध.
 • ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची सुविधा.
 • शहरातील विकासकामांची माहिती.
 • महाड शहराचा इतिहास आणि पर्यटन स्थळांची माहिती.
 • नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना आणि बातम्या.

या संकेतस्थळामुळे महाड शहर डिजिटल दिशेने एक पाऊल पुढे गेले आहे, अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या कार्यक्रमात  सामाजिक न्याय  विभागाचे मंत्री श्री  संजय शिरसाट,  रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभुमी विकास विभागाचे मंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, ओमप्रकाश बकोरिया आयुक्त - समाजकल्याण महाराष्ट्र राज्य,  बार्टीचे महासंचालक सुनील वारे,  किसन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड तसेच लोकप्रतिनिधी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

000

हे पण वाचा  'संवैधानिक कर्तव्यपूर्ती हीच बाबासाहेबांना आदरांजली'

About The Author

Advertisement

Latest News

Advt