पवारांचा राजीनामा: बाउन्सर की गुगली?
निर्णय मागे घेण्याची पक्षनेत्या कार्यकर्त्यांसह सहयोगी पक्षांनाही आशा
शरद पवार हे देशातील जेष्ठ, कसलेले आणि मुरलेले राजकारणी समजले जातात. पक्षाला आणि देशाला त्यांची गरज असता ते आपल्या राजीनामेच्या निर्णयाच्या पुनर्विचार करतील आणि पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी पुन्हा पुढाकार घेतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे गटासारख्या महाविकास आघाडीतील त्यांच्या सहयोगी पक्षांनाही वाटत आहे. त्यामुळे पवार यांचा राजीनामा प्रत्यक्षात बाउन्सर ठरणार की गुगली, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
मुंबई: प्रतिनिधी

पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी साश्रू नयनाने पवार यांना आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. सुरुवातीला त्याला ठाम नकार देणाऱ्या पवार यांनी कार्यकर्त्यांचा आग्रह पाहून, पक्ष नेतृत्वाचा निर्णय घेण्यासंबंधी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा निर्णय आपल्याला मान्य असेल, असे नमूद केले. पवार यांना राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेण्याबाबत विनंती करणाऱ्या नेत्यांमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या या समितीत सहभागी असलेल्या नेत्यांचाही समावेश होता. त्यामुळे ही समिती पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करेल आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पवार ती मान्य करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा सहयोगी असलेल्या पक्ष उद्धव ठाकरे गट याचे खासदार आणि प्रवक्ते व पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संजय राऊत यांनी आडपडद्याने हीच शक्यता वर्तवली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या राजकीय प्रवासात एका टप्प्यावर बाळासाहेब राजकारणाबद्दल उद्विग्न झाले होते. त्यांनी शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, शिवसेनेचे तत्कालीन नेते आणि कार्यकर्ते यांचा आग्रह बाळासाहेब टाळू शकले नाहीत. त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला. या घटनेची आठवण करून देत राऊत यांनी पवार यांच्या बाबतीतही याचीच पुनरावृत्ती घडण्याचा संकेत दिला आहे.
Comment List