'लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रच होणार'

सुप्रिया सुळे यांची कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याची सूचना

'लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रच होणार'

इंदापूर: प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या ही निवडणुका एकत्रित होतील. केंद्राचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून पक्षातील कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्या. 

बावडा नरसिंगपूर जि. प. गटात अडीअडचणी जाणून घेण्यासाठी सुळे यांनी धावता दौरा केला. यावेळी टनु येथे जाहीर समारंभात त्या बोलत होत्या. केंद्रातील भाजप सरकार हे हुकूमशाही व जनविरोधी असल्याने देशाची अधोगती झाली आहे. या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावरही नाव न घेता टीका केली. केंद्राचे राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचा इंदापूर तालुक्यात भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी याच दिवशी दौरा आयोजित केला होता. मात्र या कार्यक्रमास पक्ष म्हणून नव्हे तर मतदारसंघाच्या खासदार तसेच इंदापूरचे आमदार यांना निमंत्रित करणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता आमदार व खासदार पदाचा अवमान केला, अशी टीकाही सुळे यांनी केली.

हे पण वाचा  'समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही'

दिल्ली येथे महिला कुस्तीगीर आंदोलकांवर झालेल्या पोलिसी लाठीमाराचा तसेच ओडिशा रेल्वे अपघातात 288 लोकांचा मृत्यू नव्हे तर खूनच झाला असल्याबाबत आपण संसदेत आवाज  उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघाताचा सीबीआय तपास करणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले असले तरी त्यातून काही निष्पन्न होणार नसून सीबीआय, ईडी इत्यादी संस्था या मोदी सरकारच्या प्रभावाखाली आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 

यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या कामाचा लेखा-जोखा सांगत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर प्रखर टीका केली.
        

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

नागपूर दंगल सरकारपुरस्कृत आहे म्हणावे का?
BARTI news | वेबसाईट द्वारे महाडचा सत्याग्रह आता मराठीसह कन्नड भाषेतही!
'ऊसतोडणी कामगारांसाठी एक खिडकी योजना राबवा'
प्रशांत दामले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर
विरोधी गटाचे मताधिक्य रोखण्याचे सत्ताधारी गटाकडे मोठे आव्हान!
निवडणूक सह्याद्री साखर कारखान्याची पण पेरणी मात्र नगरपरिषद निवडणुकीची!
'मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे'
'वाचाळ मंत्र्याला वेळीच आवर घालणे आवश्यक'
आजपासून माथेरान पर्यटकांसाठी बेमुदत बंद
पीएचडी मार्गदर्शकांचे गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा