साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी घेतली डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट
शाल, पुष्पगुच्छ, पुस्तके देऊन केला दांपत्याचा सन्मान
On
नागपूर : प्रतिनिधी
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि त्यांच्या पत्नी अरुणा शोभणे यांनी विधानभवन नागपूर येथे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी सन्माननीय मंत्री दीपक केसरकर, गिरीश महाजन आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
या भेटी दरम्यान उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी शोभणे दाम्पत्याचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पुस्तक भेट दिले.
Comment List