पुण्यासाठी भव्य विमानतळ होणार: पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक

पुणे टर्मिनलचे लवकरच उद्घाटन

पुण्यासाठी भव्य विमानतळ होणार: पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक

पुणे: प्रतिनिधी

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधा चांगल्या केल्या जात  आहेत. भारत पुढे जाऊन मेडिकल हब होईल. सर्व सोयी उपलब्ध होतील, पुण्यालाही भव्य विमानतळ उभारला जाईल. आहे त्या धावपट्टीचा विस्तार केला जाईल. त्या दृष्टीने सरकारचा रोडमॅप तयार आहे. पुण्यातील टर्मीनल चे उद्घाटन लोकसभा निवडणूकीआधी होईल ', अशी माहितीकेंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

'आयुष्मान भारत ' योजने च्या माध्यमातून ५ लाखाच्या आतील वैद्यकीय सुविधा आहेत, त्याहीपुढे जाऊन रुग्णांना मदत मिळण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नाईक यांनी केले.

रूबी हॉल क्लिनिच्या वतीने हॉटेल रित्झ कार्लटन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीपाद नाईक यांनी विविध मुद्यांवर संवाद साधला. रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रँट, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला, बेहराम खोडाईजी उपस्थित होते.

हे पण वाचा  मद्यपानाचे व्यसन लपविल्यास मिळणार नाही विम्याची रक्कम

श्रीपाद नाईक म्हणाले,' रूबी हॉल क्लिनिक चे नाव ऐकून होतो. हे अत्याधुनिक हॉस्पिटल आहे. केंद्र, राज्य सरकार पाठीशी राहील. विमानतळाचा विस्तार आणि विकास करून हे टुरिझम पुढे नेले जाईल.  भारत पुढे जाऊन मेडिकल हब होईल. सर्व सोयी उपलब्ध होतील, जगातील स्वस्त उपचार येथे होतील. वेलनेस सेंटर होईल. जगाला सुखी करण्याचा प्रयत्न होईल. आयुषच्या माध्यमातून पारंपारिक उपचार पुढे येत आहेत. प्रसार माध्यमातून सकारात्मकता पुढे येत आहे. वैद्यकीय सेवेतून श्रीमंत होणे हा उद्देश नसतो, सेवा हाच उद्देश असतो. रुबी हॉलचे प्रयत्न देखील त्या दृष्टीने महत्वाचे आहेत. कमी खर्चात चांगली सेवा देता यावी, देशाचे नाव त्यातून मोठे होईल. या साठी या क्षेत्रातील सर्व संस्थांनी आपला वाटा उचलावा.

डॉ.परवेझ ग्रँट म्हणाले,' मेडिकल टुरिझम पुण्यात पुढे जाण्यासाठी विमानतळासारख्या पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या असणे आवश्यक आहेत. एप्रिलपर्यंत रुबी हॉलमध्ये देशात प्रथमच अत्याधुनिक यंत्रणा आणली जात आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणे विस्तार होण्याची क्षमता मेडिकल टुरिझम मध्ये आहे. सरकारने पुढाकार घ्यावा.

बेहराम खोदाईजी यांनी स्वागत केले. डॉ सायमन ग्रँट आदि उपस्थित होते.

 

 

About The Author

Advertisement

Latest News

नाट्य परिषद कोथरूड शाखेने उभारली सांस्कृतिक कलावंत गुढी नाट्य परिषद कोथरूड शाखेने उभारली सांस्कृतिक कलावंत गुढी
पुणे : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे आज (दि. 20) मराठी नववर्षारंभ (गुढी पाडवा) आणि यशवंतराव चव्हाण...
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नव्या संचातील 'तुझे आहे तुजपाशी'चा  रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर
लष्करी अधिकाऱ्याकडून लष्करी अधिकाऱ्याचीच फसवणूक
ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख शिंदे गटात डेरेदाखल
खंडणी आणि खुनाबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा महत्त्वाचा जबाब
महाराष्ट्र बँक सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण
'मालवणी पोलिसांचा अहवाल तत्कालीन सरकारच्या दबावाखाली?'

Advt