कोरेगाव नगरपंचायतीवर २३ जानेवारी रोजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा हंडा मोर्चा
कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायतीमध्ये कोरगाव शहरातील नागरिकांना एक दिवसाआड पाणी उपलब्ध होत आहे .या आधी कधीही अशी वेळ कोरेगाव शहरातील नागरिकांवरती आली नव्हती. या आधी शहरातील लोकांना मुबलक पाणी उपलब्ध होत होते.परंतु आता पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील नागरिकांना कोरगाव नगरपंचायती मध्ये मुख्य अधिकारी यांच्या दालनाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत .तरी सुद्धा पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही ही शोकांतिका आहे.
कोरेगाव नगरपंचायतीचा कारभार पाहणाऱ्या मुख्याधिकारी यांचं हे अपयश आहे की सर्वसामान्य नागरिकांपर्यंत हे पाणी पोहोचू शकत नाहीत यापेक्षा मोठी दुर्दैवाची बाब कोणती नाही याकरिता २३ जानेवारी रोजी कोरेगाव तहसीलदार कार्यालय आंदोलन ठिकाणा पासून कोरेगाव नगरपंचायत इथे हंडा आंदोलन कोरेगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विरोधी पक्ष नेते नगरपंचायत व नगरसेवक तसेच कोरगाव शहरातील नागरिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
कोरेगाव तहसीलदार कार्यालयातून सकाळी दहा वाजता हे हंडा आंदोलन सुरुवात करणार आहोत तिथून नगरपंचायत व नगरपंचायतीवरून जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडक आंदोलन करण्यात येणार आहे दरम्यान कलेक्टर साहेबांना धोम धरणातून कृष्णा नदीला कोरेगांव येथील वसना नदी व तीळ गंगा व D Y 7 कॅनलला पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती करणार आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वा खाली हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
याबाबत अधिक बोलताना नगरपंचायती चे नगरसेवक व विरोधी पक्ष नेते हेमंत आनंदराव बर्गे यांनी सांगितले प्रमाणे जिहे कटापूर उपसा सिंचन योजना चे बंधारे खुले करावे त्यामुळे कोरेगाव नगरपंचायतचा जो जॅकवेल बंधारा आहे त्या बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला ब्रह्मपुरी च्या बंधारा आहे त्या बंधाऱ्याचे दरवाजे बसवण्यात यावे म्हणजे कोरेगावच्या नगरपंचायत वाटर सप्लाय ला पाणी उपलब्ध होऊ शकते असे या वेळी सांगितले
यावेळी जिल्हा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे, विरोधी पक्ष नेते हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे,.गणेश धनावडे, दिनेश सणस, किशोर बर्गे,अमरसिंह बर्गे, दिनेश बर्गे, सनी शिर्के, मनोज येवले,रमेश नाळे,श्रीकांत जाधव, सागर बर्गे, संतोष भंडलकर,गणेश घाडगे, बबलू जमादार,राजू शेख, किरण देशमुख यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000