मराठवाड्यासह विदर्भाच्या काही भागात भूकंपाचे धक्के

कोणतीही जीवित अथवा वित्तहानी न झाल्याचा प्रशासनाचा निर्वाळा

मराठवाड्यासह विदर्भाच्या काही भागात भूकंपाचे धक्के

छत्रपती संभाजी नगर : प्रतिनिधी 

आज सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात भूकंपाचा धक्का बसला. त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, भूकंपाचे हे धक्के सौम्य स्वरूपाचे असून त्यामुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

आज सकाळी सात वाजून 14 मिनिटांनी मराठवाड्यातील जालना, हिंगोली, परभणी, नांदेड यासह विदर्भातील वाशिम जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता साडेचार रिस्टर्स स्केल एवढी नोंदविण्यात आली. या भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी  तालुक्यात रामेश्वर तांडा या गावाजवळ असल्याचे दिसून आले आहे. 

मागील काही दिवसापासून या परिसरात जमिनीच्या आतून गूढ आवाज येत असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळून आले होते. त्याप्रमाणे त्यांनी तालुका आणि जिल्हास्तरावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्याची कल्पना देखील दिली होती. काही महिन्यापूर्वी याच भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामुळे या भागाचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 

हे पण वाचा  'कोण कोणाला गिळतोय ते लवकरच कळेल'

About The Author

Advertisement

Latest News

Advt