मावळ व मुळशी तालुक्यात पाच दिवस पर्यटन बंदी
मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा निर्णय
पुणे: प्रतिनिधी
पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून शहर जलमय झाले आहे. शहराबरोबरच जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून प्रशासनाने मावळ आणि मुळशी तालुक्यातील पर्यटन स्थळी जाण्यास पाच दिवसांसाठी बंदी केली आहे. ही बंदी 29 तारखेच्या सकाळी आठ वाजेपर्यंत लागू राहील.
पुणे शहर आणि परिसरात रात्रभर पाऊस पडत आहे. सर्व धरणातून पाणी सोडण्यात आले असून नद्या नाले ओसंडून वाहत आहेत. रस्ते जलमय झाले असून अनेक घरात पाणी शिरले आहे. बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाचे पथक आणि लष्कराला ही पचारण करण्यात आले आहे.
मावळ आणि मुळशी तालुक्यातील धरणांसह अनेक ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांची गर्दी होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये जीवितहानीचा धोका असल्याने अशी पर्यटन स्थळे पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची क** अंमलबजावणी केली जाणार असून त्यासाठी पोलिसांची पथके अशा ठिकाणांवर फिरती गस्त घालणार आहेत.