शाहु टोलनाक्याजवळ स्थिर निरीक्षण पथकाकडून ६ लाख ९४ हजार रुपये जप्त!
On
कोल्हापूर - कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात स्थिर सर्वेक्षण पथकानं उजळाईवाडी हद्दीतील शाहु टोलनाक्याजवळ पथक क्रमांक ८ चे प्रमुख सुशांत शिरतांडे यांनी २३ ऑक्टोबर रोजी वाहन तपासणी दरम्यान एका इनोव्हा वाहनातून ६ लाख ९४ हजार रुपयांची रोकड जप्त केलीय. ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात सिलबंद करुन ठेवण्यात आलीय, अशी माहिती दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मिक यांनी दिलीय. या रक्कमेबाबत आयकर विभागाकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.
ooo
Tags:
Comment List