विमानात बॉम्ब ठेवल्याच्या वर्षभरात तब्बल 999 धमक्या
मुरलीधर मोहोळ यांनी सभागृहात दिली माहिती
नवी दिल्ली: प्रतिनिधी
या वर्षाच्या सुरुवातीपासून नोव्हेंबर पर्यंत विमानात बॉम्ब ठेवल्याच्या तब्बल 999 धमक्या आल्या असून त्या सर्व पोकळ ठरल्याची माहिती नागरी उदयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीस सभागृहाला लिखित स्वरूपात दिलेल्या उत्तरात दिली आहे.
आतापर्यंत खोडसाळ पणाने विमान कंपन्यांच्या कार्यालयात दूरध्वनी करून विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या देण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प होते. या वर्षात असे पोकळधमक्यांचे प्रमाण अनेक पटीने वाढले असून जानेवारी 2024 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत विमानात बॉम्ब ठेवल्याच्या तब्बल 999 धमक्या विमान कंपन्यांना देण्यात आल्या. अर्थातच त्या पोकळ ठरल्या. एकट्या ऑक्टोबर महिन्यात अशा पोकळ धमक्यांची संख्या तब्बल 666 होती.
या सर्व धमक्या पोकळ असल्या तरी देखील विमान कंपन्यांना नियमानुसार त्याची दखल घ्यावीच लागते. अशी धमकी मिळाल्यानंतर संबंधित विमानाचे उड्डाण स्थगित करून विमानाची काटेकोर तपासणी करण्यात येते. या प्रक्रियेत बराच वेळ जातो. त्यामुळे विमानांचे वेळापत्रक बिघडते आणि अनेक प्रवाशांची देखील धांदल उडते.
Comment List