मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गटाची स्वबळाची चाचपणी
सर्व प्रभागात तयारीला वेग
मुंबई: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्यानंतर येऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने चाचपणी सुरू केली आहे. महापालिकेच्या सर्व 227 प्रभागात त्यादृष्टीने तयारीला वेग आला आहे.
P महाविकास आघाडीसह सर्वच घटक पक्षांना विधानसभा निवडणुकीत मोठ्या धक्क्याला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या तिन्ही पक्षांची. कामगिरी सुमार झाली आहे. आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी एकीकडे मतदान यंत्रावर खापर फोडणे सुरू केले असले तरीही संघटनात्मक पातळीवर पराभवाची कारण मी मावसा करण्यास सुरुवात केली आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवाची आणि महायुतीच्या विजयाची अनेक कारणे असली तरीही महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये असलेला संवादाचा अभाव, किंबहुना शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वादविवाद हे देखील एक प्रमुख कारण आहे. विशेषतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांअसलेल्यालेली खडा जंगी निवडणूक प्रचाराच्या काळात लक्षणीय ठरली.
विधान परिषद निवडणूक पार पडल्यानंतर अल्पावधीतच मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व प्रमुख महापालिकांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. करुणा काळाच्या आधीपासून ते आत्तापर्यंत राज्यभरात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. महापालिका निवडणुका दरम्यान महायुतीतील घटक पक्ष आपला प्रभाव कायम राखण्याच्या दृष्टीने तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने या निवडणुकांच्या रिंगणात उतरणार आहेत.
मुंबई महापालिका हा शिवसेना ठाकरे गटासाठी प्राणच मानला पाहिजे. दीर्घकाळ मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता राहिली आहे. अनेक राज्यांपेक्षा मोठा अर्थसंकल्प असलेली मुंबई महापालिका शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून धडा घेऊन ठाकरे गटाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या शिंदे गटाचा प्रभाव मुंबईपेक्षा ठाणे जिल्ह्यात अधिक असल्याने मुंबई महापालिकेची सत्ता कायम राखण्याचा ऑटोकाट प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जाणार आहे. त्यासाठी पक्षाने महापालिकेच्या सर्व 227 प्रभागांमध्ये शिवसेनेचे नेते, आमदार, सचिव आणि संघटक यांच्यामध्ये जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीत एकला चलो रे चा ठाकरे गटाचा नारा महाविकास आघाडीच्या पडझडीची नांदी ठरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Comment List