पवनमावळात बापूसाहेब भेगडेची प्रचारात जोरदार मुसंडी
विकासकामे केली म्हणता...अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांची आमदार शेळकेंवर तीव्र टीका
वडगाव मावळ/प्रतिनिधी
मावळ मतदारसंघात चार हजार कोटीचा भरीव विकासनिधी आणून मोठा विकास झाल्याचे सांगत आहेत. तेच आमदार विकास बाजूला सोडून मतदारसंघात जनतेला प्रलोभन दाखवण्यासाठी पैसे, साडया वाटप करत असल्याची खरमतरीत टीका सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी केली.
पवन मावळातील परंदवडी, धामणे, पिंपळखुटे, शिवणे, मळवंडी, थूगाव, आर्डव, येलघोल, धनगव्हाण, भडवली, शिवली, कोथुर्णे, वारू, ब्रम्हणोली, ठाकूरसाई, तिकोना पेठ आदी गावांना भेट देत येत्या २० तारखेला पिपाणी चिन्हासमोरील बटण दाबून बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहत औक्षण केले. प्रत्येक गावात ग्रामस्थांनी फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोषात स्वागत केले. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दिलीप ढमाले, राष्ट्रवादी काँग्रेचे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, माजी उपसभापती कल्याणी ठाकर, काँग्रेसचे जेष्ठ नेते दिलीप ढमाले, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव वरघडे, नामदेव पोटफोडे, ग्रामस्थ, तरुण, तरुणी, वारकरी संप्रदाय, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बापूसाहेब भेगडे म्हणाले, विद्यमान आमदार यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून, त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. जनतेने त्यांचे खरे व खोटे रुप पाहिलेले असून, जनतेला आता सर्व गोष्टी समजलेल्या आहेत. जे विश्वासघात करतात अशा मंडळीच्या पाठीमागे जनता उभी राहत नाही. आमदार सुनील शेळके नेहमी टिमकी वाजवतात की, मतदारसंघात विकास झाला, चार हजार कोटीचा निधी आणला; परंतु मग त्यांना साड्या, पैसे, विमान प्रवास असे उद्योग का करावे लागतात. पैसे वाटणारे कार्यकर्ते नेमके कोण आहेत, हे तपासले तरी सर्व गोष्टी स्पष्ट होतात.
सोमाटणेमध्ये आमदार शेळके यांचे कार्यकर्ते व्यासायिक सचिन मुऱ्हे यांच्या कार्यालयातून 37 लाख रुपये पकडण्यात आले. देहूमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीतून मतदारांना पैस व साड्या वाटप करताना रंगेहाथ पकडले गेले. आमदारांना सत्तेची व पैशाची मस्ती असून, त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नाही, तर विश्वासघाताचे व्हीजन आहे. त्यामुळे जनतेने निवडणुकीत सावध रहावे, असे आवाहनही बापूसाहेब भेगडे यांनी केले.
मावळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्याकडून प्रचारात दडपशाही, गुंडगिरी व धनशक्तीचा सर्रास वापर केला जात आहे. आतापर्यंत त्यांच्यावर आचारसंहिता भंगचे चार गुन्हे दाखल झालेले आहे. आचारसंहितेच्या मर्यादा काय असाव्यात याबाबत आमदारांना माहिती असायला पाहिजे. शेळके यांना पराभव दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याने ते गैरमार्गाचा अवलंब करत आहे. मतदारांना प्रलोभन दाखवून, दमदाटी करुन दहशत निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात परंतु जनता अशा गोष्टींना साथ देणार नाही.
-संजय बाळा भेगडे (माजी राज्यमंत्री)
Comment List