माण - खटावची निवडणुक प्रहारमुळे तिरंगी बनली - सारिका पिसे |
म्हसवड
माण - खटावमध्ये सध्या सुरु असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीच्या मात्तबर उमेदवारांसमोर म्हसवडचा अभिमान म्हणुन ओळखल्या जाणार्या प्रहार जनशक्ति पक्षाच्या अरविंद पिसे यांनी मोठे आव्हान उभे केले असुन माण मध्ये दुरंगी वाटणारी निवडणुक ही प्रहारमुळे तिरंगी बनली असल्याचे मत प्रहार जनशक्ति पक्षाच्या महिला आघाडीच्या सारिका पिसे यांनी व्यक्त केले.
माण विधानसभा मतदार संघात सध्या २१ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असले तरी ही निवडणुकी महायुती व महा विकास आघाडीमध्ये होईल अशीच अटकळ बांधली जात असताना आता या निवडणुकीत प्रहारच्या पिसे यांनी नवीन ट्विस्ट निर्माण केले असुन दुरंगी वाटणारी ही निवडणुक आता तिरंगी बनली आहे. प्रहार जनशक्ति पक्षाकडुन निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या अरविंद पिसे यांच्या उमेदवारीला सामान्य जनतेतुन मोठा प्रतिसाद मिळत आहे. आजवर सामान्य जनतेला फक्त मोठ मोठी स्वप्ने दाखवुन त्यांची दिशाभुल करण्याचे काम येथील मात्तबर नेत्यांनी केल्यामुळे सामान्य जनतेची फक्त ससेहोलपट होत आहे, सामान्य जनतेला येथील नेत्यांनी आजवर फक्त गृहीत धरुन स्वत: चा राजकिय डाव साधला आहे ही परिस्थिती अरविंद पिसे यांनी बदलुन दाखवली आहे, पिसे यांनी जेव्हापासुन राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आहे तेव्हापासुन सामान्य जनतेला हे नेते मंडळी किंमत देवु लागले आहेत. सामान्य जनतेचे खरे प्रश्न काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत याची संपूर्ण माहिती घेवुन त्यावर काम करीत असल्यानेच सामान्य जनतेने त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे. मी त्यांच्या प्रचारासाठी घरोघरी फिरत असताना अनेक महिला आपल्याशी मनमोकळ्या चर्चा करताना पिसे साहेबांनी आपणाला कशी मदत केली हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पिसे यांच्या बद्दलचे प्रेम दिसुन येते सामान्य जनतेनेच ही निवडणुक आपल्या हातात घेतली आहे.
पिसे यांनी आजवर केलेल्या सामाजिक कामामुळे म्हसवड सह मतदारसंघाच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळाली आहे, पिसे यांनी सामान्य जनतेला आजवर शासनाचे कोट्यावधी रुपये मिळवुन दिले आहेत हेेच पैसे माण - खटावच्या बाजारपेठेत फिरत आहेत. त्यातुन सर्वसामान्य कुटुंबाचे संसाराचे चक्र सुरु झाली आहेत.
सामान्य जनतेला दिवास्वप्न दाखवुन विकासाचे गाजर दाखवण्यापेक्षा या जनतेला प्रत्यक्ष मदत करणे हा पिसे यांचा स्वभाव असल्याने ही जनताच त्यांच्यासाठी आता प्रचार करीत आहे. माणसह खटावच्या ग्रामीण भागातील दुर्लक्षीत घटकांना आजवर पिसे यांनी त्यांचे हक्क व अधिकार मिळवुन दिल्यानेच पिसे यांच्या उमेदवारीला सामान्य जनतेने आपलेसे करीत त्यांच्या पाठीशी आपली ताकत उभी करु लागली आहे. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ति पक्षाचाच विजय होणार असल्याचे शेवटी यांनी सांगितले.
०००
Comment List