दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा

आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने ७१ गावांमधील ३६०० विद्यार्थ्यांना सुविधा

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा

 

वडगाव मावळ/प्रतिनिधी 

मावळ तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत आणि विनासायास पोहोचता यावे, यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने ‘मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन’च्या वतीने मोफत वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम सन २०१६-१७ पासून सुरू असून यंदा नवव्या वर्षात पदार्पण करत आहे. यंदाच्या परीक्षेसाठी ३,६०० हून अधिक विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ मिळणार आहे.

इंदोरी, बोरवली, पवनानगर, जांभूळ, ब्राह्मणवाडी, तुंग, निगडे, आंबळे, घोलपवाडी, कदमवाडी, गोळेवाडी, मंगरूळ, निळशी, कुसुर, कुसवली, पवळेवाडी, कल्हाट, भोयरे, कशाळ, सावळा, सांगवी, शिवणे, डोणे, ओवळे, थोरण, वडेश्वर, धनगव्हाण, वारू, कोथुर्णे, मळवंडी, बौर, ओझर्डे, पिंपळवळी, पाथरगाव, कार्ला, अजिवली, वराळे, साई, नवीन उकसान, नाणे, सोमाटणे, बेबेडओहोळ, परंदवडी, शिरगाव, गोडुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे, दारुंब्रे, भोयरे, सुदुंब्रे, आढले बुद्रुक, करुंज, निगडे, देवघर, उकसान आदी ७१ गावांमधील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्या-येण्यासाठी मोफत प्रवास व्यवस्था करण्यात आली आहे.

हे पण वाचा  महाराष्ट्र बँक सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण

१४ परीक्षा केंद्रांवर ७,०४७ विद्यार्थी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला मावळ तालुक्यातील १४ परीक्षा केंद्रांवर एकूण ७,०४७ विद्यार्थी बसणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहतूक सेवा उपयुक्त ठरणार आहे.

परीक्षा केंद्रे आणि त्यातील विद्यार्थीसंख्या पुढीलप्रमाणे आहे

- रामभाऊ परूळेकर विद्यानिकेतन, तळेगाव दाभाडे - १०६२ विद्यार्थी

- ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर, तळेगाव दाभाडे - ७१२ विद्यार्थी

- श्री शिवाजी विद्यालय, देहूरोड - २८९ विद्यार्थी

- संत तुकाराम विद्यालय, देहूगाव - ५८५ विद्यार्थी

- सेंट ज्युड हायस्कूल, देहूरोड - ४६९ विद्यार्थी

- न्यू इंग्लिश स्कूल, वडगाव मावळ - ७७६ विद्यार्थी

- फोर एस इंग्लिश मीडियम स्कूल, देहगांव - ३०४ विद्यार्थी

- पवना विद्यामंदीर, पवनानगर - ४४१ विद्यार्थी

- पंडीत नेहरु विद्यालय, कामशेत - ६०४ विद्यार्थी

- डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालय लोणावळा - ३५२ विद्यार्थी

- न्यू इंग्लिश स्कूल, चांदखेड - ३२८ विद्यार्थी

- ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल, लोणावळा - ६८४ विद्यार्थी

- ऑक्झीलिअम कॉन्व्हेंट हायस्कूल, लोणावळा - ३६६ विद्यार्थी

- संपर्क ग्रामीण विद्याविकास केंद्र भांबर्डे - ७५

प्रवास सुविधेची गरज का?

मावळ तालुक्यातील अनेक विद्यार्थी दुर्गम भागांतून येतात. परीक्षेच्या काळात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बससेवा मर्यादित असल्याने तसेच अवैध प्रवासी वाहतुकीच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहोचणे कठीण होते. ही गरज लक्षात घेऊन आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेतला आणि ‘घर ते परीक्षा केंद्र’ मोफत प्रवास सेवा सुरू केली.

विद्यार्थ्यांसाठी मोलाची सोय

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता येईल आणि परीक्षा संपल्यानंतर घरी परतणे सोयीचे होईल. गेल्या नऊ वर्षांपासून चालू असलेल्या या सेवेमुळे पालक आणि विद्यार्थी समाधान व्यक्त करत आहेत.

या उपक्रमामुळे तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळत आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

विद्यार्थ्यांसाठी ही मोफत सेवा उपयुक्त ठरणार असून, या उपक्रमामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मानसिक शांती मिळेल आणि परीक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल.

"विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी शिक्षणासोबतच त्यांना आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे. ही मोफत वाहतूक सेवा विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू केली असून, भविष्यातही ती सुरू राहील."

- आमदार सुनील शेळके

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधावा

मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन संपर्क: +91 96659 29009

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

महार रेजिमेंटच्या मुख्यालयात उभारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा! महार रेजिमेंटच्या मुख्यालयात उभारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा!
पुणे: प्रतिनिधी मध्य प्रदेशातील सागर येथे असलेल्या महार रेजिमेंटच्या मुख्यालयात घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी...
स्वमग्नता : योग्य वेळी योग्य उपचाराची गरज!
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत संमत
वेदांत ओडिशाला जागतिक पॉवरहाऊसमध्ये रूपांतरित करत आहे!
'व्यापाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करा'
'तुम्ही तर पुढच्या पंचवीस वर्षासाठी पक्षाचे अध्यक्ष'
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी बदलले खंडपीठ

Advt